MB NEWS-परळी बीड नगर रेल्वे मार्ग उद्यापासून सुरु, आष्टीपर्यंत धावणार बारा डब्यांची पहिली प्रवाशी रेल्वे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन प्रणालीद्वारे दिल्लीतून हिरवा झेंडा दाखवून करणार शुभारंभ

  परळी बीड नगर रेल्वे मार्ग उद्यापासून सुरु, आष्टीपर्यंत धावणार बारा डब्यांची पहिली प्रवाशी रेल्वे

पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन प्रणालीद्वारे दिल्लीतून हिरवा झेंडा दाखवून करणार शुभारंभ


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

      बीड जिल्हा वासियांच्या दृष्टीनं  महत्त्वपूर्ण असलेल्या परळी बीड नगर रेल्वे मार्गावर उद्या दि.३ पहिल्यांदाच नगर ते आष्टी प्रवासी रेल्वे धावणार आहे. नगर ते आष्टी या 67 किलोमीटर अंतरावर पहिली पॅसेंजर रेल्वे गाडी सुरू होत असून याचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन प्रणालीद्वारे दिल्लीतून हिरवा झेंडा दाखवून करणार आहेत. यावेळी त्यांच्यासमवेत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनकुमार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बीडच्या खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे आणि नगर दक्षिणचे खासदार डॉक्टर सुजय विखे हे उपस्थित राहणार आहेत. 

          नगर परळी रेल्वे मार्गाचे एकूण लांबी 261 किलोमीटर आहे. नगरपासून आष्टीपर्यंत 67 किलोमीटर अंतराचे काम पूर्णही झाले आहे. मागील महिन्यांमध्ये या रेल्वेची चाचणी पूर्ण झाली. त्यामुळे प्रत्यक्षात प्रवासी रेल्वे कधी सुरू होणार याकडे त्यांचे लक्ष लागले होते .


असा असेल नगर आष्टी रेल्वे मार्ग....

      अहमदनगर ते नारायणडोह दरम्यान  7 कि.मी.अंतरावर  मार्च 2018 रोजी सात डब्याच्या रेल्वेची चाचणी झाली होती नंतर अहमदनगर - नारायणडोह - सोलापूरवाडी या 15 कि.मी. अंतरावर दि. 25 फेब्रुवारी 2019 रोजी 7 डब्याची रेल्वे चाचणी झाली मात्र नंतर लॉकडाऊनमुळे पुढील काम मंदावले आणि आष्टीपर्यंत कधी रेल्वे चाचणी होणार हा प्रश्न ऐरणीवर आला होता त्यानंतर सोलापूर वाडी ते आष्टी 32 किमी अंतरावर 20 डिसेंबर 2021 रोजी चाचणी घेण्यात आली.

नगर ते आष्टी सहा थांबे

    अहमदनगर ते आष्टी 67 किलोमीटर अंतर असून या दरम्यान सदरील रेल्वेगाडी सहा ठिकाणी प्रवाशांची चढ-उतार करणार आहे यामध्ये प्रथम नारायणडोह,लोणी ,सोलापूर वाडी, धानोरा, कडा व आष्टी या रेल्वे स्थानकाचा समावेश आहे.आष्टी तालुक्यातील पाच व नगर जिल्ह्यातील एक स्थानकावर लवकरच तिकीट गृह सुरू आहे.त्यामुळे प्रवाशांना प्रवास सुलभ होणार आहे.


टिप्पण्या

  1. पुढील मोठे अंतर लवकर पूर्ण होवून परळी वासियांना लाभ लवकर मिळावा ही प्रभु वैजनाथ चरणी प्रार्थना

    उत्तर द्याहटवा
  2. परळी पर्यंत ही रेल्वे कधी धावेल याची प्रतिक्षा परळीकरांना आहे. त्यामळे नगर मार्गे पूणे, शिर्डी तसेच मुंबई जाणे सोयिस्कर होणार आहे.
    हा मार्ग लवकर सुरु व्हावा हीच अपेक्षा आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. परळी ला लवकर यायला पाहिजे रेल्वे

    उत्तर द्याहटवा
  4. स्व.मा.गोपीनाथराव मुंडे यांचे मोठे स्वप्न साकार होत आहे त्यांनी या साठी खूप लढा दिला
    आता आमच्या परळी पर्यंत लवकर येण्यासाठी दोन्ही .... ताईंनी....
    परीश्रम करावे

    उत्तर द्याहटवा
  5. खूप छान

    लवकरात लवकर मार्ग पूर्ण व्हावा

    तसेच एक्सप्रेस आणि पसिंगर दोन्ही गाड्या धावाव्यात

    उत्तर द्याहटवा
  6. सर्वसामान्यांचे नेते अर्थात लोकनेते माजी मंत्री स्व गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना शतशः अभिवादन ! या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी रेल्वेमंत्री व आत्ताचे रेल्वेमंत्री तसेच रेल्वे राज्यमंत्री आणि खासदार प्रीतम ताई मुंडे यांचे अभिनंदन व आभार ! 67 किलोमीटर चा टप्पा पूर्ण होऊन नगर ते आष्टी रेल्वेसेवा सुरू झाली याबद्दल कडा व आष्टी करांचे अभिनंदन !
    आता सुमारे 180 किलोमीटरचे काम प्रगतीपथावर आहे हे काम जलद गतीने पूर्ण झाले की, आष्टी ते बीड व बीड ते परळी रेल्वेसेवा सुरू होईल. स्वयंपाक शिजेपर्यंत दम असतो पण तो निवे पर्यंत दम नसतो. असे आता परळीकर यांना झाले आहे. या कामास आणखी किती दिवस लागतील याचा काही अंदाज कुणी अद्याप व्यक्त केलेला नाही. असो, बीड लोकसभा मतदारसंघातील सर्व जनतेचे अभिनंदन!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार