MB NEWS-परळी बीड नगर रेल्वे मार्गावर प्रवाशी रेल्वे सुरु, आष्टीपर्यंत धावली दहा डब्यांची पहिली गाडी

  परळी बीड नगर रेल्वे मार्गावर प्रवाशी रेल्वे सुरु, आष्टीपर्यंत धावली दहा डब्यांची पहिली गाडी


आष्टी, प्रतिनिधी...

      बीड जिल्हा वासियांच्या दृष्टीनं  महत्त्वपूर्ण असलेल्या परळी बीड नगर रेल्वे मार्गावर आज दि.३  रोजी पहिल्यांदाच नगर ते आष्टी प्रवासी रेल्वे धावली. नगर ते आष्टी या 67 किलोमीटर अंतरावर पहिली पॅसेंजर रेल्वे गाडी सुरू झाली.  याचा अधिकृत शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन प्रणालीद्वारे उद्या शुक्रवारी होणार असल्याची माहिती आहे. 

          नगर परळी रेल्वे मार्गाचे एकूण लांबी 261 किलोमीटर आहे. नगरपासून आष्टीपर्यंत 67 किलोमीटर अंतराचे काम पूर्णही झाले आहे. मागील महिन्यांमध्ये या रेल्वेची चाचणी पूर्ण झाली. त्यामुळे प्रत्यक्षात प्रवासी रेल्वे कधी सुरू होणार याकडे त्यांचे लक्ष लागले होते . अखेर आज आज दि.३  रोजी पहिल्यांदाच नगर ते आष्टी प्रवासी रेल्वे धावली.रेल्वे प्रवाशांनी दहा डब्यांच्या गाडीतून प्रवास केला. दरम्यान स्वप्नपूर्ती झाली असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !