MB NEWS-चोरट्यांनी वळवला चहाच्या टपरीवर मोर्चा: पळवले गॅस सिलेंडर, पाण्याचा जार,चहाचं पातेलं व दोन खुर्च्या !

 चोरट्यांनी वळवला चहाच्या टपरीवर मोर्चा: पळवले गॅस सिलेंडर, पाण्याचा जार,चहाचं पातेलं व दोन खुर्च्या !

दिंद्रुड, एमबी न्युज वृत्तसेवा......

      कोरोनाकाळात उत्पन्नाचे सर्व स्त्रोत बंद झाले आहेत.प्रत्येकजण यातूनच जात आहे.मग चोर, चोरटे आणि भुरटे चोर यांचीही प्रचंड विवंचना झालेली आहे. त्यामुळे संधी दिसताच डल्ला मारण्यासाठी चोरटे आसुसलेले आहेत. असाच चोरीचा प्रकार नित्रुड ता.माजलगाव येथे घडला आहे.चोरटयाचा चक्क चहाच्या टपरीवर मोर्चा वळला आणि  गॅस सिलेंडर, पाण्याचा जार,चहाचं पातेलं व दोन खुर्च्या पळवले.याप्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

     सर्वत्र चोरीच्या घटना वाढल्या असल्याने यावर प्रतिबंधक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. चोरट्यांचे सत्र सुरू असतानाच चोरांची नवनविन ट्रीक समोर येत आहेत  नित्रुड ता.माजलगाव येथे फिर्यादी सखाराम वासुदेव डाके यांच्या हाॅटेलमधुन गॅस सिलेंडर,चहाचं पातेलं,पाण्याचा जार, व दोन खुर्च्या दि.६ रोजी अज्ञात चोरांनी चोरुन नेले.याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोना दुधाने हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !