MB NEWS-परळी वैजनाथ: गणेशपार भागात दोन गटात तुंबळ हाणामारी ; परस्परविरोधी गुन्हे दाखल

परळी वैजनाथ: गणेशपार भागात दोन गटात तुंबळ हाणामारी ; परस्परविरोधी गुन्हे दाखल 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

       दोन  गटांत तुंबळ हाणामारीची  घटना बुधवार, दि.02 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेत दोन्हीही बाजूचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत. याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. 

         गणेशपार रोडवर दोन  गटांत तुफान भांडण झाले. माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक दीपक देशमुख व माजी नगरसेवक कराळे यांच्यात ही भांडणे झाली. धनंजय बालासाहेब कराळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार माजी नगराध्यक्ष दीपक रंगनाथराव देशमुख, मुकुंद दीपक देशमुख, निलेश देशमुख, गणेश देशमुख, सुनील देशमुख यांच्यावर कलम 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 505, 427 भादंवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गणेश दिपकराव देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माहेशनाना कराळे, धनंजय कराळे व ओम कराळे यांच्यावर संभाजीनगर ठाण्यात कलम 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 505, 427 भादंवी नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आले. पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक मंठाले हे घटनेचा अधिक तपास करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार