MB NEWS-*विहिरीत बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू; अंबाजोगाईतील दुर्घटना*

  *विहिरीत बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू; अंबाजोगाईतील दुर्घटना*



अंबाजोगाई - शहरातील स्वाराती रुग्णालयाच्या रोडवरील कंपनी बागेतील विहिरीत बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. ही घटना आज शुक्रवारी (दि.०४) दुपारी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. निदा अल्ताफ शेख (वय १६) आणि सानिया अल्ताफ शेख (वय १८) अशी त्या बहिणींची नावे आहेत. 


अतिशय गरीब कौटुंबिक परिस्थिती असलेल्या निदा आणि सानिया या दोघी आई-वडिलांसोबत अंबाजोगाईतील फॉलोअर्स क्वार्टर भागात राहत होत्या. मुळचे हैदराबादकडील राहिवासी असलेले हे कुटुंब अंबाजोगाईत स्थायिक झाले होते. अल्ताफ हे फिरून भांडेविक्रीचा व्यवसाय करतात तर त्यांची पत्नी लोकांकडे धुणीभांडी करते. शुक्रवारी सकाळी अल्ताफ यांनी निदा आणि सानियाला त्यांच्या मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी मोरेवाडीला सोडले होते. दुपारी त्या दोघी तिथून परत येत असताना त्या विहिरीत बुडाल्या. विहिरीबाहेर त्यांची पर्स पडलेली दिसून आल्याने एका युअकाने विहिरीत डोकावून पहिले असता त्याला दोघींचे मृतदेह तरंगताना आढळून आले. याबाबत माहिती मिळताच अंबाजोगाई  शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक तरुणांच्या मदतीने दोघींचे मृतदेह विहिरीबाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवून दिले. दरम्यान, दोन्ही बहिणी विहिरीत पडल्या कि त्यांनी आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. गरिब परिस्थितीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !