परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
"> 🔷 *राज्याचा अर्थसंकल्प ११ मार्चला अधिवेशन ३ मार्चपासून*
--------------------------------------------
मुंबई : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत गुरुवार ३ ते २५ मार्च दरम्यान होणार असून , अर्थमंत्री अजित पवार ११ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
करोनामुळे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गेली दोन वर्षे नागपूरला झालेले नाही. त्यामुळे यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेण्याची मागणी भाजपाने केली होती. त्यानुसार २८ फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेण्याची घोषणा करण्यात आली होती. राज्यपालांच्या अभिभाषणासाठी नागपूरच्या विधानभवनात उभय सभागृहांच्या एकत्रित बैठकीकरिता मध्यवर्ती सभागृह नाही. तसेच आमदार निवासाचा करोना केंद्रासाठी अजूनही वापर करण्यात येत असल्याने आमदाराच्या निवासाची व्यवस्था करणे शक्य नसल्याचे कारण देत अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने गेल्याच आठवडय़ात घेतला होता. त्यावर कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. अधिवेशनाच्या सुरुवातीला करोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करुन सर्वानी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच करोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असेल.
⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛
कामकाज सल्लागार समितीची बैठक विधिमंडळात पार पडली. बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून ) उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधान परिषद आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा