MB NEWS-सुवर्णकार समाजाच्या अध्यक्षपदी सुरेश टाक, उपाध्यक्षपदी सुनील दहिवाळ, सचिवपदी संदीप टाक

सुवर्णकार समाजाच्या अध्यक्षपदी सुरेश  टाक, उपाध्यक्षपदी सुनील  दहिवाळ, सचिवपदी संदीप टाक



परळी वैजनाथ दि.०१ (प्रतिनिधी)

          येथील सुवर्णकार समाज व सराफा असोसिएशनची माजी नगरसेवक व समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अरुण टाक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सुवर्णकार समाज व सराफा असोसिएशनच्या नुतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

       श्री संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिरात मंगळवारी (दि.०१) झालेल्या बैठकीत सर्वानुमते सुवर्णकार समाजाच्या अध्यक्षपदी सुरेश (आण्णा) सखाराम टाक, उपाध्यक्षपदी सुनील दिगंबरराव दहिवाळ, सचिवपदी संदीप सुभाषराव टाक, कोषाध्यक्षपदी भारत टाक, तर सदस्य म्हणून संदीप वामनराव टेहरे व काशिनाथ शहाणे, सुनीलराव विडेकर, अनिरुद्ध डहाळे, संजयराव बुरांडे, सूर्यकांत कुलथे, रमेशराव मुंडलिक धारासूरकर, बाळू शेठ उदावंत रमाकांत बाबुराव डहाळे यांची निवड करण्यात आली आहे, तसेच प्रसिद्धी प्रमुख संतोष कमलाकरराव उदावंत यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान श्री संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिर अध्यक्षपदी एकमताने अरुण शेठ टाक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच याच बैठकीत सराफा असोसिएशनची कार्यकारिणी एकमताने जाहीर करण्यात आली आहे.सराफा असोसिएशनच्या अध्यक्ष राहुल अरुण टाक, उपाध्यक्ष बालाजी प्रकाशराव टाक, सचिव संदीप सुभाषराव टाक, कोषाध्यक्ष विनायकराव दहिवाळ, सदस्य बंडू टाक, अमर देशमुख, संतोष टाक, ओमकार शहाणे, रमेशराव मैड, अमोल डहाळे, रमाकांत टाक, सुभाषराव दीक्षित या पदाधिकाऱ्यांची एक मताने निवड करण्यात आली आहे. बैठकीच्या सुरुवातीला श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व आरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुरेश टाक यांनी केले. अरुण टाक यांनी सर्व सुवर्णकार सराफ व्यापाऱ्यास मार्गदर्शन केले व समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन देऊन व श्री संत नरहरी महाराज मंदिर नवीन बांधण्यासाठी १५ लाख रुपये खर्च करून मंदिर बांधून देण्याची सर्वस्वी स्वतःजबाबदारी स्वीकारली.या कार्यक्रमास सुवर्णकार समाजातील ज्येष्ठ मंडळी अरुण टाक, राजाभाऊ दहिवाळ, श्यामराव टाक, भागवतराव दहिवाळ, बंडू टाक, दत्ताभाऊ दीक्षित, जगनाथराव शहाणे, सचिन डहाळे, रमेश मैड, मुन्ना टाक, ओमकार शहाणे, अमोल डहाळे, नाना टाक, भारत टाक, सुभाषराव दीक्षित, बालाजी टाक, सुनील विडेकर, अशोकराव डहाळे,भास्करराव उदावंत, देवरथ खोगरे, पप्पू खोगरे, अक्षय मुंडलिक, पप्पू जगदाळे, राजाभाऊ बोकन, बालाजी दहिवाळ,  बाबुराव शहाणे,बाळू शहाणे, बालाजीराव टाक, गजानन डहाळे, बालाजीराव घवले, सतीश टेहरे, सतीश डहाळे, दिलीप बुरांडे,रवी  डहाळे,रवी दहिवाळ, चंदू दहिवाळ, संजयराव शहाणे, अर्जुन नावंदे, विष्णुपंत टाक, सुरेशराव टेहरे, सुरेशराव दहिवाळ, महादेव टेहरे, रविभाऊ टाक, अरुणराव टाक,वैजनाथ बोकन, प्रशांतराव शहाणे, अरुण बोकन, सुनील टाक, किरण बोकन, ज्ञानेश्वर डहाळे, ज्ञानेश्वर जगदाळे अरुण शहाणे सचिन दीक्षित उमेश मेड, अक्षय कदम, मनोज उदावंत, गोविंद उदावंत, सतीश मैड, दिपक डहाळे, विजय सावंत, प्रमोद डहाळे, श्याम उदावंत, मंगेश डहाळे व सर्व सुवर्णकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार