MB NEWS-अडीच लाखांचा गुटख्याचा माल व दोन गाड्या जप्त; पंकज कुमावत यांच्या पथकाने केली कारवाई

  अडीच लाखांचा गुटख्याचा माल व दोन गाड्या जप्त; पंकज कुमावत यांच्या पथकाने केली कारवाई

माजलगाव, प्रतिनिधी.....

       अडीच लाखांचा गुटख्याचा माल व दोन गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. सहाय्यक पोलीस अधीक्षकपंकज कुमावत यांच्या पथकाने  कारवाई केली.

          दिनांक 02/02/2022रोजी  पोलीस अधीक्षक  यांना माहिती मिळाली की माजलगाव येथील राजाभाऊ गाडगे व त्र्यंबक डुकरे हे दोघेजणह बेकायदेशीररित्या स्वतःची फायदा करीता महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला व लोकांचे जीवितास हानिकारक असलेला गुटख्याचा माल त्यांचे जवळील स्कार्पिओ गाडी क्रमांक एम एच 20 सी एस 3199 मध्ये मध्ये आणून आझाद चौक माजलगाव येथे माजलगाव व बीड येथील व्यापारी यांना देणार आहे अशी माहिती  सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावात  यांना कळविल्याने श्री पंकज कुमावत साहेब यांचे मार्गदर्शनाखाली  उपविभागीय पोलीस अध्यक्ष कार्यालयाचे पोलीस आमलदार यांना सदर बातमीची ठिकाणी पाठवून दिनाक 03/02/2022 रोजी 08.15वाजता छापा मारला असता सदर ठिकाणी पाच इसम एक स्कार्पिओ एक शिफ्ट डिझायर जागीच ताब्यात घेऊन झडती घेता स्कार्पिओ डिजायर मध्ये राज निवास सुगंधी पानमसाला गुटख्याची पाच बोरे किमती 2 लाख 50 हजार रुपये व 1 स्कार्पिओ एक स्विफ्ट डिजायर असा एकूण 9 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन एकूण सात आरोपी विरुद्ध पोलिस ठाणे माजलगाव शहर येथे पोलीस हेड कॉन्स्टेबल बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केलेला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक साहेब बीड मा. अप्पर पोलीस अधीक्षक साहेब अंबाजोगाई  सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोहेका बालाजी दराडे बाबासाहेब बांगर पोना राजू वंजारे  राम हरी भंडारे सचिन आहंकारे यांनी केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !