इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-छत्रपती शिवाजी महाराज उभ्या राष्ट्राचे आराध्य दैवत- धनंजय आढाव

छत्रपती शिवाजी महाराज उभ्या राष्ट्राचे आराध्य दैवत- धनंजय आढाव  






⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛

परळी वै.प्रतिनिधी.....

               शहरातील, गणेशपार भागात, वैद्यनाथ विद्यालय परिसरात, शिवसेना माजी उपशहर प्रमुख, सचिन स्वामी,बालासाहेब देशमुख, दीपक जोशी, संजय गावडे,यांच्या मुख्य आयोजनाखाली,शिवभक्त शिवजयंती उत्स्फूर्तपणे साजरी करण्यात आली. सर्वात प्रथम, शिव सेना माजी तालुका प्रमुख जगन्नाथ साळुंखे, वैद्यनाथ विद्यालया मधील हरीश देशमुख सर,नवनाथ सरवदे,अश्विन मोगरकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.

आवर्जून बघा:🏵️ *शिवजयंतीला ना.धनंजय मुंडे यांनी केली परळीत महत्त्वपूर्ण घोषणा.*

    या प्रसंगी बोलतांना माजी पत्रकार संघ अध्यक्ष,धनंजय आढाव यांनी छत्रपती शिवाजी महाराज, यांच्या इतिहासाची पाने उलगडून, श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले,आणि छत्रपती शिवाजी महाराज, हे उभ्या राष्ट्राचे आराध्य दैवत असल्याचा आवर्जून उल्लेख केला.

🏵️ *आवश्य बघा: परळीत शिवजयंतीचा उत्साह,रोशनाई आणि दैदिप्यमान सजावट.*

    यावेळी, रमेश लोखंडे,काळे सर, सरवदे सर,जगन्नाथ कदम,पांडुरंग पाणखडे,वैजनाथ लोखंडे,ज्ञानेश्वर पवार भागवत कदम,दीपक देशमुख, यासह असंख्य शिवभक्त, वैद्यनाथ विद्यालय शिक्षक, कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

-----------------------------------------
MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.
-----------------------------------------


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!