MB NEWS-*शिवनामात रंगला अवघा भक्तरंग*


*शिवनामात रंगला अवघा भक्तरंग .....

 *परळीत श्री. संत मन्मथस्वामी महाराजांचा जन्मोत्सव थाटात साजरा*

*परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-*


येथील श्री  गुरूलिंग स्वामी मठ संस्थान (बेलवाडी) मध्ये विरशैव लिंगायत समाज परळीच्या वतीने श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराजांच्या जन्मोत्सव आज शनिवार दि.5 फेबु्वारी 2022 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी उपस्थित महिलांनी पाळना म्हणला व पुजा केली. संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामींचा जन्मोत्सवानंतर आरती झाली. गुरूवारपासुन श्री मन्मथस्वामी महाराजांचे तीन दिवसीय परम रहस्य पारायणास प्रारंभ झाला होता, शनिवारी जन्मोत्सवचा कार्यक्रम झाला.यावेळी वीरशैव लिंगायत समाजाच्या महिला  सहभागी झाल्या. गुरूराज माऊली, श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय अशा जयघोषाचा निनाद करण्यात आला. शनिवारी श्री संत शिरोमणी मन्मथस्वामी जन्मोत्सव साजरा करण्यासाठी महिलांची उपस्थिती होती. सकाळी पारायण दुपारी जन्मोत्सव व महाप्रसाद झाला व तीन दिवसीय पारायण कार्यक्रमाची सांगता  झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वीरशैव  लिंगायत समाज परळीच्या महिला, पुरूष व युवकांनी अथक परिश्रम घेतले. दरम्यान वरील सर्व कार्यक्रम covid-19 नियमांचे पालन करून संपन्न झाला.

*शिवनामात रंगला अवघा भक्तरंग*

परळी हे वैद्यनाथ प्रभूंच्या वास्तव्याने पुणित झालेले शहर असून या शहराच्या कानाकोपर्‍यात नेहमीच कार्यक्रम होत असतात. त्यातही श्रीं च्या पायथ्याशी असलेल्या श्री गुरूलिंगस्वामी मठात नुकतीच संत शिरोमणी मन्मथस्वामी जन्मोत्सव कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास असलेली महिलांची  उपस्थिती होती.  सातत्याने होणार्‍या शिवनामात अवघा भक्तरंग भरला गेला. या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल उपस्थित भाविकांनी संयोजकांचे आभार व्यक्त करण्यासोबतच असे कार्यक्रम मानवी जीवाला शुद्ध करण्यासोबत अंत:करणात श्रद्धेचे बीजारोपण करतात अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार