MB NEWS-गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नाला व वैद्यकीय आढचणीतील रुग्णांना केली जाते आर्थिक मदत पौळ पिंपरीचे सरपंच पती माणिकराव पौळ यांचा उपक्रम

  गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नाला व वैद्यकीय आढचणीतील रुग्णांना केली जाते आर्थिक मदत 

पौळ पिंपरीचे सरपंच पती माणिकराव पौळ यांचा उपक्रम 


परळी (प्रतिनिधी)

तालुक्यातील मौजे पौळ पिंपरी हे मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. येथील ग्रामपंचायत गेल्या 15 वर्षांपासून राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. गावातील विकासाबरोबरच सामाजिक अडचणी सोडविण्यात पक्षाचे गावातील नेते नेहमी अग्रभागी असतात. त्यापैकीच अग्रगण्य नाव म्हणजे युवक नेते माणिकराव पौळ आणि त्यांच्या पत्नी सौ.शामल माणिकराव पौळ. गावातील गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नाला आर्थिक हातभार लावण्यासोबत कोणाला वैद्यकीय अडचणीत आर्थिक मदत लागत असेल तरीही ते धावून जातात. गेल्या अनेक वर्षांपासूनची त्यांची ही मदत परंपरा अद्यापही अविरतपणे सुरूच आहे.

राजकारण हे समाजकारणाला धरून केले गेले पाहिजे असं म्हणतात. आशा पद्धतीचे राजकारण करणारे लोक फार क्वचित आढळून येतात. त्यातल्या त्यात गावातील राजकारणात तर ही बाब अत्यंत दुर्मिळ दिसते. मात्र काही नेते मंडळी अशीही आहेत की जी राजकारणाच्या सर्व चौकटी बाजूला ठेऊन लोकांच्या अविरत सेवेत असतात. गोरगरिबांच्या लग्नाला आणि वैद्यकीय अडचणीला मदत करण्याचा संकल्प करून तो गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्यक्षात आणण्याचे काम पौळ पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते माणिकराव पौळ यांच्या माध्यमातून होत आहे. गावातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलींच्या लग्नाला लागेल तशी आणि जमेल तशी आर्थिक मदत तर करतातच मात्र गावातील एखाद्याला वैद्यकीय अडचण निर्माण झाल्यास ते धावून जातात. ते सांगतात की, आमचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे आणि त्यांचे खंबीर सारथी वाल्मिक अण्णा कराड आणि लक्ष्मण तात्या पौळ यांच्याकडून आम्हाला समाजकार्याची नेहमीच प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळत असल्याने आम्ही लोकांच्या मदतीला धावून जाऊ शकतो. मदतीचा हा यज्ञ आम्ही पुढेही चालू ठेवणार असल्याचा संकल्पही त्यांनी बोलून दाखवला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार