MB NEWS- *पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे ह.भ.प. शामसुंदर सोन्नर*

  *पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे ह.भ.प. शामसुंदर सोन्नर*


*परळी वै.ता.२ प्रतिनिधी*

तुकोबारायांच्या ओवी मधून बुरांडे कुटुंबचे वर्णन करत. संत कोणाला म्हणावे? असा प्रश्न नेहमी विचारला जातो.पांढरे कपडे,पांढरा सदरा,पांढरा फेटा परिधान केला म्हणजे संत नव्हे तर समाज उद्धार करणारे सर्वच संत असतात हे तुकोबा रायांनी सांगितले आहे. दिवंगत गंगाधरअप्पा, दिवंगत परमेश्वरअप्पा या बुरांडे कुटुंबातील सदस्यांनी गोरगरीब परिवारातील मुलांना वसतिगृह सुरू करून पवित्र अशा ज्ञान दानाचे कार्य केले हे काही संतांच्या कार्यापेक्षा कमी नाही. 


महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक, मोहा गावचे माजी सरपंच कॉ.परमेश्वरअप्पा बुरांडे यांच्या बुधवार दि 2 रोजी आयोजित गोड जेवणाच्या कार्यक्रम प्रसंगी कीर्तनकार,समाज प्रबोधनकार हभप श्यामसुंदर सोंनर महाराज आपल्या सुमधुर वाणीतून कीर्तन करत असताना सांगत होते.


संत तुकोबारायांच्या अभंगाचे वर्णन करीत उपस्थिती समुदायाला विचार करण्यास प्रवृत्त करीत प्रबोधन करत हभप श्यामसुंदर सोंनर महाराज यांनी हल्लीच्या तथाकथिक संतावर परखड टीका करीत  हल्ली संतांची देखील जाहिरातबाजी होत आहे,भगवे वस्त्र परिधान करून गळ्यात अनेक मोठं मोठ्याला माळा घालून हल्लीचे संत व त्यांचे अनुयायी मोठी जाहिरातबाजी करत असताना समाजात पहावयास मिळते हे मोठे दुर्दैव आहे असे

ज्या राज्यात संत ज्ञानोबा राया, संत तुकोबा राया यांच्या सारखे संत घडले ज्यांना कोणत्याही प्रकारे जाहिरात न करता आज ही लाखो वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होतात हे किती किती मोठे कार्य संतांचे आहे त्याच प्रमाणे दिवंगत गंगाधरअप्पा, दिवंगत परमेश्वरअप्पा यांच्या केलेल्या कार्याची जाहिरातबाजी करण्याची गरजच नाही.बुरांडे कुटुंबीयांनी केलेल्या ज्ञानदानाच्या पवित्र कार्यामुळे आज हजारो गोरगरीब कुटुंबातील मोठ्या पदावर कामावर आहेत असे ही त्यांनी आपल्या कीर्तनातून सांगितले.

यावेळी पंचक्रोशीतील बुरांडे कुटुंबीयाबद्दल जिव्हाळा असलेली असंख्य लोकांची उपस्थिती होती

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार