MB NEWS-शेतातील सोयाबीनची उभी रास नेली चोरून; ५० हजारांचे सोयाबीन चोरीप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

  शेतातील सोयाबीनची उभी रास नेली चोरून; ५० हजारांचे सोयाबीन चोरी प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

परळी वैजनाथ, प्रतिनिधी......

      नागापुर शिवारात असलेल्या शेतातील सोयाबीनची उभी रास  चोरून नेली अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. यामध्ये अंदाजे १५ क्विंटल (अंदाजे किंमत५० हजार) सोयाबीन चोरीप्रकरणी पाच जणांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     याबाबत ग्रामीण पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नाशिकेत संभाजी गित्ते वय 47 वर्ष व्यवसाय शेती रा. वाघबेट ता परळी वै.हे अनंत त्रंबक देशपांडे यांचे शेतीत सालगडी म्हणुन मागील चार वर्षांपासून काम करतात. या वर्षी नागापुर शिवारातील ऊंबरदरा शेत गट नं 589 मधील अनंत जंबक देशपांडे यांचे मालकीचे शेतीत सोयाबीन, हायब्रीड, तुर या पिकाची पेरणी केली होती, त्यापैकी  हायब्रीड व तुरीची रास करून ते घरी आणले होते व शेतातील सोयाबीन काढून ते वडखेल ते नागापुर जाणारे पांदण रस्त्याचे बाजुला शेतात अंदाजे 100 मीटर मध्ये ढीग घालुन ठेवला होता. सोयाबीनचा ढीग पाहण्यासाठी ते दररोज शेतात जात असत, ते दिनांक 06/02/2022 रोजी सायंकाळी 06.00 वाजता सोयाबीनचा ढीग पाहुन घरी आले. त्यानंतर दिनांक 09/02/2022 रोजी सकाळी 10.00 वा ते व त्यांच्या सोबत गोविंद वाल्मीक मुंडे रा. वाघबेट असे शेतात गेले तर सोयाबीनचा ढीग  दिसला नाही, शेतात आजुबाजुला पाहणी केली परंतु सोयाबीन दिसुन आले नाही. त्यांतर त्यांनी शेत शेजारी  यांना विचारपुस केली असता  काल दिनांक 08/02/2022 रोजी सायंकाळी 04.00 वा. सुमारास लिबोटा तांड्यावरील 1. सिताबाई कोंडीबा जाधव 2. मंगुबाई राजाराम जाधव 3. नामदेव नंदा राठोड, 4. भानुबाई नामदेय राठोड 5. शंकर नंदा राठोड सर्व रा. सातीआंबा तांडा यांनी बैलगाडी लावुन सोयाबीनचा पुर्ण ढीग चोरुन घेवुन गेले आहेत असे सांगितले. ते सोयाबीन अंदाजे 15 क्विंटल किंमत अंदाजे 50000 रुपयाचे आहे. 

     याप्रकरणी आरोपींविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पो.ना.केंद्रे हे करीत आहेत.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !