MB NEWS-महाशिवरात्र यात्रा : जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत सोमवारी पुर्वतयारी आढावा बैठक

  महाशिवरात्र यात्रा : जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत सोमवारी पुर्वतयारी आढावा बैठक

परळी वैजनाथ ,प्रतिनिधी.....

       महाशिवरात्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत वैद्यनाथ देवस्थान सभागृह येथे सोमवार दि.14 फेब्रुवारी रोजी पूर्वतयारीबाबत बैठक आयोजित करण्यात  आली आहे. श्रीक्षेत्र परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिलिंग असून प्रत्येक महाशिवरात्रीला लाखो भाविक श्रीं च्या दर्शनासाठी येतात. या पार्श्वभूमीवर शहरात मोठी यात्रा सुद्धा भरत असते. सलग दोन वर्ष कोरोना प्रार्दुभाव वाढत असल्याने यात्रा होवू शकली नाही.

       यावर्षी दि.1 मार्च रोजी महाशिवरात्र यात्रा असून वैद्यनाथ यात्रेसाठी पूर्वतयारी आढावा बैठक 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वा. वैद्यनाथ देवस्थान सभागृह येथे होत आहे. वैद्यनाथ देवस्थानच्या वतीने महाशिवरात्र यात्रा पूर्वतयारी बैठक घ्यावी अशी विनंती करण्यात आली होती. त्यास जिल्हाधिकारी कार्यालयाने संमती दिली असून येत्या सोमवारी ही बैठक होणार आहे.अशी माहिती अप्पर जिल्हा दंडाधिकारी संतोष राऊत यांनी दिली.

         दरम्यान पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत होत असल्याने यावर्षी महाशिवरात्र यात्रा होण्याची शक्यता आहे. कोरोना प्रार्दुभाव कमी झाला असला तरी अजूनही निर्बंध असल्याने काही नियम व अटी लावून ही यात्रा होवू शकते. या संदर्भातील महाशिवरात्र यात्रा बैठकीचे पत्र विविध 14 शासकिय कार्यालयांना देण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार