MB NEWS-जिल्हाधिकारी यांचे आदेश: मिरवणुका, मोर्चे निदर्शने, आंदोलने,धरणे आंदोलने, रास्ता रोको यासारख्या आंदोलनांना मनाई

जिल्हाधिकारी यांचे आदेश:  मिरवणुका, मोर्चे निदर्शने, आंदोलने,धरणे आंदोलने, रास्ता रोको  यासारख्या आंदोलनांना मनाई

बीड,एमबी न्युज वृत्तसेवा....
      बीड जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) प्रमाणे मनाई आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड यांनी पारित केले असून आज मध्यरात्री पासून हा आदेश लागू होणार आहे.
      बीड जिल्हयात कायदा व सुव्यवस्थे अबाधित राहण्यासाठी  जिल्हयात होणा-या राजकिय सामाजिक हालचाली व घडामोडीमुळे मोर्चे निदर्शने, आंदोलने, धरणे आंदोलने, रास्तारोको आंदोलने या सारखे आंदोलने होऊन यातुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दि 19 रोजी शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे. जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या करीता कलम 37 (1) (3) मु. पो. का. चे लागू करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे आज दि 10 रोजी मध्यरात्री पासून ते दि 24 च्या मध्यरात्री पर्यंत बीड जिल्हयात कलम 37 (1) (3) म.पो.का.चे लागु करण्यात आली आहे.या  कालावधीकरिता महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) अन्वये पांच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही किंवा मिरवणुक / मोर्चा काढता येणार नाही तसेच शासकिय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी किंवा त्याच्या जवळ शस्त्र, सोटे, काठी, तलवार, बंदूक जवळ बाळगणार नाहीत.लाठ्या, काठया, शारिरीक इजा होण्यास कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील, अशा वस्तु ,कोणतेही दाहक पदार्थ, किंवा स्फोटके जवळ बाळगणार नाही.दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा फोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधे गोळा करून ठेवणार नाहीत किंवा बाळगणार नाहीत किंवा तयार करणार नाहीत.आवेशी भाषणे, अंगविक्षेपण, विडंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किया ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा फलक किंवा इतर कोणत्याही वस्तु जवळ बाळगणार नाहीत. जाहिरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे किंवा कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मुल्यांच्या विरुध्द असेल किंवा देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोहचवणारी असेल किंवा सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहचवणारी असेल आणि जाहिरपणे प्रक्षोभक भाषण व असभ्य वर्तन करणार नाहीत.व्यक्तीच्या किंवा शवांच्या किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्याच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणार नाहीत.

यामुळे आज आज मध्यरात्री पासून पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समोवश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही किंवा मिरवणुक / मोर्चा काढता येणार नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !