इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS- *शेतकऱ्यांना बळ आणि तरुणांना नव्या संधी देणारा अर्थसंकल्प : खा.प्रितमताई मुंडे* *आत्मनिर्भर भारताचे प्रतिबिंब अधोरेखित करणारा व समग्र विकासाला गती देणारा अर्थसंकल्प*

 *शेतकऱ्यांना बळ आणि तरुणांना नव्या संधी देणारा अर्थसंकल्प : खा.प्रितमताई मुंडे*



*आत्मनिर्भर भारताचे प्रतिबिंब अधोरेखित करणारा व समग्र विकासाला गती देणारा अर्थसंकल्प*


बीड । दि.०१ ।

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प शेतकऱ्यांना बळ देणारा आणि तरुणांना नव्या संधी उपलब्ध करून देणारा आहे.सर्व घटकांना पूरक व देशाच्या समग्र विकासाला गती देणाऱ्या अर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचे प्रतिबिंब अधोरेखित होते आहे अशी प्रतिक्रिया देऊन खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले.


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी वर्ष २०२२-२३ साठी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. नाबार्डच्या माध्यमातून देशातील तरुणांना स्टार्टअपसाठी अर्थसहाय्य करण्यासह शेतकऱ्यांना कृषी आणि कृषी आधारित उद्योगांसाठी बळ देणारी तरतूद त्यांनी अर्थसंकल्पातून जाहीर केली. यामुळे शेतकरी आणि तरुणांना उभारी मिळणार असल्याचे खा.प्रितमताई मुंडे यांनी सांगितले.


तसेच देशात पंचवीस हजार किलोमीटरचे नवे राष्ट्रीय महामार्ग निर्माण करणे, प्रधानमंत्री आवास योजनेतून सर्वसामान्यांसाठी ऐंशी लाख घरे बांधणे, विद्यार्थ्यांसाठी ई-शिक्षण,कृषी आधारित नव्या उद्योगांना कर्ज देणे,एक लाख नव्या अंगणवाड्या, चारशे नव्या वंदे भारत रेल्वे निर्माण करणे आणि उद्योगांना बळ देण्यासह राज्यांना अतिरिक्त निधी देण्याच्या महत्वपूर्ण तरतुदी या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत,त्यामुळे हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक व आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळ देणारा असल्याचे खा.प्रितमताई मुंडे म्हणाल्या.


•••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!