MB NEWS- *श्री संत शिरोमणी मन्मथस्वामी जन्मोत्सवनिमित्त पारायण सोहळयास उत्साहात प्रारंभ*

 *श्री संत शिरोमणी मन्मथस्वामी जन्मोत्सवा निमित्त पारायण सोहळयास उत्साहात प्रारंभ*



*परळी/प्रतिनिधी*


वीरशैव लिंगायत समाज, परळीच्या वतीने श्री संत शिरोमणी मन्मथस्वामी जन्मोत्सवानिमित्त आज गुरूवार दि.3 फेब्रुवारी रोजी श्री संत शिरोमणी मन्मथस्वामी पारायण सोहळयास उत्साहात प्रारंभ झाला.

श्री वैद्यनाथ मंदिरशेजारी असलेल्या श्री गुरूलिंगस्वामी मठ (बेलवाडी) येथे आज गुरूवार दि.3 ते 5 फेब्रुवारी पर्यंत दररोज सकाळी 8 ते 12 या वेळेत वीरशैव लिंगायत समाज, परळीच्या वतीने श्री संत शिरोमणी मन्मथस्वामी जन्मोत्सवानिमित्त आज गुरूवार दि.3 फेब्रुवारी रोजी श्री संत शिरोमणी मन्मथस्वामी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. या पारायण सोहळयास आज गुरूवारी उत्साहात प्रारंभ झाला. दरम्यान शनिवार दि.5 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.21 वा. श्री संत मन्मथस्वामी जन्मोत्सव साजरा केला जाणार असून या कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन  वीरशैव लिंगायत समाज परळीच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान कोविड-19 चे सर्व नियम व अटींचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार