MB NEWS-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वाल्मीक अण्णा कराड यांच्या वाढदिवसा निमित्त शालेय साहित्य वाटप‌ ; गोरगरिबांना मदत करणाऱ्या अण्णांना दीर्घायुष्य लाभो - रवींद्र परदेशी

  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वाल्मीक अण्णा कराड यांच्या वाढदिवसा निमित्त शालेय साहित्य वाटप‌ ;

गोरगरिबांना मदत करणाऱ्या अण्णांना दीर्घायुष्य लाभो - रवींद्र परदेशी

परळी वैजनाथ दि १ ( प्रतिनिधी ) :- परळी नगरपरिषद येथील माजी गटनेते तथा राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक तथा गोरगरीब सर्वसामान्यांना न्याय देणारे वाल्मीकअण्णा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. नेहमीच गोरगरिबांना सर्वतोपरी मदत करणाऱ्या वाल्मीकआन्नांना दीर्घायुष्य लाभो असे प्रतिपादन माजी उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रवींद्र परदेशी यांनी केले.

वाल्मीकआन्ना कराड यांच्या वाढदिवसानिमित्त आज माजी उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रवींद्र परदेशी यांनी आज वैजनाथ सोळंके, जालिंदर नाईकवाडे, आनंद इंगळे, महादेव रोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अशोक नगर व आंबेडकर नगर येथील जवळपास ३०० गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले.  यावेळी बोलताना रवींद्र परदेशी म्हणाले की वाल्मिक आण्णा कराड हे नेहमीच गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना दवाखाना असो,  लग्नकार्य असो किंवा शिक्षण असो कोणत्याही अडीअडचणीवेळी मदत करतात धावून येतात त्यामुळे गोरगरिबांना व सर्वसामान्यांना वाल्मीक आन्ना कराड यांच्या रूपात एक आधारवड मिळाला आहे अशा सामाजिक कार्यात वाहून घेणाऱ्या वाल्मीक अण्णांना दीर्घायुष्य लाभो अशी मी प्रभू चरणी प्रार्थना करतो अशी प्रतिक्रिया व्यक्त केली या प्रसंगी वैजनाथ सोळुंके आनंद इंगळे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

ह्या प्रसंगी विजय अटकोरे, शिवराज सुरवसे, पवन वाघमारे, संजय नेटके, शाहू कांबळे, देवडे मामा, मिराताई पाचांगे, श्रीमती ढेंगळे, विशाल दांडगे, मनोहर सुरवसे यांच्यासह आंबेडकर नगर व अशोक नगर भागातील शेकडो महिला पुरुष व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आभार विजय आटकोरे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !