MB NEWS-राजमुद्रा प्रतिष्ठान प्रभाग क्रमांक पाच आयोजीत शिवजन्मोत्सव सोहळा ‐‐---‐‐----------------------------------- खेळ पैठणीचा आणि सुंदर माझे अंगण महिलांसाठी भव्य स्पर्धा

  राजमुद्रा प्रतिष्ठान  प्रभाग क्रमांक पाच  आयोजीत शिवजन्मोत्सव सोहळा 



खेळ पैठणीचा आणि सुंदर माझे अंगण महिलांसाठी भव्य स्पर्धा 

परळी दि. १०(प्रतिनिधी) राजमुद्रा प्रतिष्ठान गंगासागर यांच्या वतीने रयतेचे राजे छञपती शिवाजी महाराज यांचा  जन्मोत्सव सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. नगरसेवक गोपाळ आंधळे आणि युवक नेते तथा राजमुद्रा प्रतिष्ठान चे प्रमुख किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१७ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०२२ पर्यंत हा महोत्सव होणार आहे. यात प्रभाग क्रमांक पाच मधील महिलांसाठी  खेळ पैठणीचा आणि सुंदर माझे आंगण अशा भव्य  स्पर्धेचे आयोजन केले असून हे  सर्व कार्यक्रम राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहेत. यात कोरोना कालावधीत केलेल्या सामाजिक कार्याबद्दल जिल्हा  नियोजन समिती चे सदस्य तथा न. प.गटनेते वाल्मीक आण्णा कराड यांना शिव गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार  असल्याची माहिती प्रसिध्दी प्रञकाद्वारे शिवजन्मोत्सव समिती चे अध्यक्ष शाम आवाड यांनी केले आहे. 

     नगरसेवक गोपाळ आंधळे व युवक कार्यकर्ते तथा राजमुद्रा प्रतिष्ठान चे प्रमुख किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली  रयतेचे राजे छञपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्त राजमुद्रा प्रतिष्ठान गंगासागर द्वारा आयोजीत या महोत्सवात प्रभाग क्रमांक पाच मधील महिलांसाठी भव्य अशा स्पर्धेचे आयोजन केले आहे. यात खेळ पैठणी चा ही स्पर्धा दि.१७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता ज्ञानबोधनी विद्यालय कृष्णा नगर येथे होणार आहे या ठिकाणी होणार्या स्पर्धेत केवळ खंडोबा नगर, किर्ती नगर, सावतामाळी मंदिर परिसर,कृष्णा नगर येथीलच महिला सहभागी होऊ शकतील. तर दि.१८ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता श्री पी.एन.काळे सर यांच्या निवासस्थाना मागे असलेल्या मैदानात चाळीस फुटी रस्ता या ठिकाणी होणार्या स्पर्धेत केवळ गंगासागर नगर, स्वराज्य चौक, सिध्देश्वर नगर, तुळजा नगर येथील महिला सहभागी होऊ शकतील दोन्ही विभागातून प्रत्येक पहिले, दुसरे आणि उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येणार आहे. पहिले बक्षीस पैठणी साडी, दुसरे बक्षीस सोन्याची नथ आणि उत्तेजनार्थ प्रेशर कुकर असे ठेवण्यात आले आहे. पैठणी साडी साठी सौजन्य पेन्टेंवार कलेक्शन याचे असणार आहे. तर मराठवाड्यातील पहिली अभिनव स्पर्धा सुंदर माझे आंगण ही स्पर्धा दि. १८ फेब्रुवारी रोजी या स्पर्धेत खंडोबा नगर, किर्ती नगर, कृष्णा नगर, सावतामाळी मंदिर परिसर या भागातील महिला सहभागी होऊ शकतील तर दि. १९ फेब्रुवारी रोजी होणार्या स्पर्धेत केवळ गंगासागर नगर, स्वराज्य चौक, सिध्देश्वर नगर, तुळजा नगर येथील महिला सहभागी होऊ शकतील. या स्पर्धेचे परीक्षण त्या त्या दिवशी सकाळी १० वाजल्या पासून सुरु करण्यात येईल. या स्पर्धेत प्रथम विजेत्या महिलेस फ्रिज चे बक्षीस मिळणार आहे तर द्वितीय क्रमांक विजेत्या महिलेस स्मार्ट फोन आणि उत्तेजनार्थ मिक्सर बक्षीस म्हणून दिले जाणार आहे. 

या दोन्ही स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बुधवार दिनांक १६ फेब्रुवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत  गोपाळ आंधळे ९८२३३३५४३९   किशोर जाधव ९६८९२६०७७७ या वाटसॲप नंबर वर आपली नाव नोंदणी  करू शकता. 

याच बरोबर शनिवार दि. १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता गंगासागर नगर चाळीस फुटी रस्ता या ठिकाणी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे  यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शिव जन्मोत्सव सोहळा ,बक्षीस वितरण ,शालेय साहित्य वाटप आणि गटनेते वाल्मीक आण्णा कराड यांना सामाजिक कार्याबद्दल शिव गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा आणि शिव जन्मोत्सव सोहळ्यास शिवप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन समिती चे अध्यक्ष शाम आवाड, उपाध्यक्ष कृष्णा पौळ, सचिव गोविंद गरड, कार्याध्यक्ष शिवहरि जाधव, कोषाध्यक्ष गणेश भालेकर, प्रसिद्धी प्रमुख समर्थ हावा, अनंत आघाव,अशोक हिंगणे,  गणेश खाडे, शंकर बुंदिले, योगेश नाईकवाडे, बापु गिराम, विठ्ठल इंगळे,  सदस्य नितीन धर्मे, शिवराज वाकडे, विनोद बिरंगे,पप्पु पौळ,  दिपक खाडे, प्रशांत शिंदे, बालाजी सिरसाठ, नितीन पौळ, अशोक कापसे, वाघू गिराम, परमेश्वर बहादुरे, नवनाथ आघाव, मुंजा उबाळे, सोमनाथ उबाळे, किशोर कापसे, प्रशांत दराडे, गजानन थळकरी, बालाजी शिंदे, उमेश वाकडे   यांनी केले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !