MB NEWS-विविध क्षेत्रात नाव कमावलेल्या भुमीपुत्रांचा "या"गावाने केला "असा" सत्कार

  विविध क्षेत्रात नाव कमावलेल्या भुमीपुत्रांचा "या"गावाने केला "असा"  सत्कार



*गाढे पिंपळगाव येथे गावातील युवकांनी विविध क्षेत्रात यश संपादन केल्याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीने सन्मान*


     *तुकाराम गडदे, अँड राजेश्वराव देशमुख, प्रा.प्रविण फुटके, विजय गिरी यांचा सन्मान*




परळी वैजनाथ दि.०९  (प्रतिनिधी)

          तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथे ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या वतीने गावातील युवकांनी विविध क्षेत्रात यश प्राप्त केल्याबद्दल सन्मान करण्यात आला. यामध्ये गावचे जावाई तुकाराम गडदे यांची वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या शेतकी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबदल तर दिनदयाळ बँकेच्या उपाध्यक्षपदी अँड राजेश्वराव देशमुख, मौलाना मुस्ताक हुसेन पुरस्कार प्राप्त झाल्याबदल प्रा.प्रविण फुटके, मेडिकलसाठी प्रवेश मिळाल्याबदल विजय गिरी यांचा सन्मान करण्यात आला.



          गाढे पिंपळगाव येथे ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या वतीने गावातील भुमीपुत्रांनी विविध क्षेत्रात यश संपादन केल्याबद्दल गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री. पापदंडेश्वर मंदिराच्या सभागृहात कौतुक सोहळ्याचे आयोजन बुधवारी (ता.०९) केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ट नागरिक धोंडीराम वाघमोडे, माजी समाजकल्याण सभापती प्रभाकर वाघमोडे, सरपंच पती चंद्रकांत सोनवणे, उपसरपंच रामेश्वर वाघमोडे, महालिंग फुटके गुरुजी, श्री.गिरी महाराज, जयवंतराव कराड आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी दिनदयाळ बँकेच्या उपाध्यक्षपदी अँड राजेश्वराव देशमुख, मौलाना मुस्ताक हुसेन पुरस्कार मिळाल्याबदल दै.सकाळचे तालुका प्रतिनिधी प्रा.प्रविण फुटके, मेडिकलसाठी प्रवेश मिळाल्याबदल विजय गिरी तर वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या शेतकी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबदल गावचे जावाई तुकाराम गडदे यांचा शाँल, श्रीफळ, पुष्पहार, मानाचा फेटा बांधून यथोचित सत्कार करण्यात आला.



 यावेळी अँड देशमुख, प्रा.फुटके, श्री.गडदे यांनी सत्काराला उत्तर दिले. तर अध्यक्षीय समारोप प्रभाकर वाघमोडे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सोमनाथ वाघमोडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य, अँड दिनकर वाघमोडे, अँड शिवानंद फुटके धोंडीराम जगताप यांच्यासह गावातील युवकांनी प्रयत्न केले. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !