MB NEWS-अँड.मनोज संकाये यांच्या समाज कार्याची समाज बांधवांनी घेतली दखल!* *मनमथ स्वामी जन्मोत्सवाचे औचित्य साधून अँड.मनोज संकाये याचा समाज बांधवांनी केला सत्कार!*

  अँड.मनोज संकाये यांच्या समाज कार्याची समाज बांधवांनी घेतली दखल!*

*मनमथ स्वामी जन्मोत्सवाचे औचित्य साधून अँड.मनोज संकाये याचा समाज बांधवांनी केला सत्कार!*


परळी/प्रतिनिधि

लोकमत पर्सन ऑफ द डे साठी येथील सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांच्या समाजकार्याची दखल घेत मनमथ स्वामी जन्मोत्सवाचे औचित्य  साधून समाज बांधवांनी त्यांचा सत्कार केला.


    महाराष्ट्रातील वाचकांच्या पसंतीला उतरलेले अग्रेसर दैनिक लोकमत च्या वतीने बीड जिल्ह्यातील विविध नेते, समाज कार्यकर्ते यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी लोकमत पर्सन ऑफ द डे यासाठी निवड केली जाते. यामध्ये त्यांनी केलेल्या समाज कार्याची दखल घेतली जाते त्यातच परळी येथील सामाजिक कार्यकर्ते युवा नेते अँड.मनोज संकाये यांचा समावेश करून त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला होता त्यानिमित्ताने मनमथ स्वामी जन्मोत्सवाचे औचित्य साधून समाज बांधवांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा लोकमत पर्सन ऑफ द डे ची फ्रेम भेट देऊन सत्कार करण्यात आला.त्यानी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत त्यामध्ये दिवाळीचा फराळ गोरगरीब मंदिरासमोर बसणारी गरीब लोक यांना ब्लँकेटचे वाटप केले होत

    नागरिकांच्या विविध समस्येला त्यांनी हात घातला आणि आवाज उठवला त्यामध्ये उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सोय करणे, दवाखान्यात मदत करणे, कोरोणा काळात अनेक रुग्णांना दवाखान्याच्या माध्यमातून त्यांनी आधार दिला. असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. त्या सर्वांची दखल घेत समाज बांधवांनी त्यांचा सत्कार केला.

    यावेळी समाजाचं खंबीर नेतृत्व तथा नगरसेवक चेतन सौंदळे, लोकमतचे परळी प्रतिनिधी तथा ज्येष्ठ पत्रकार संजय खाकरे,चिडबुके आप्पा, मकरंद नरवणे, गिरीष बेंबळगे,लहू हलगे,दिपक शेटे ,संदीप चौधरी, एलआयसी प्रतिनिधी कांचन गिरी साहेब, उमेश चौधरी, कंखरे आप्पा, कैलासरिकिबे,  चंद्रकांत उदगीरकर वेरुळे आप्पा, अनिल चौधरी, बाबासाहेब शिगे, वैजनाथ चौधरी, रमेश चौधरी, लक्ष्मीकांत बुदे, गणेश वारकरी, शशी चौधरी, अनिल आष्टेकर समाजातील ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार