MB NEWS- *शेवटी आज झाला "त्या" चार चिमुकल्यांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल*

 *शेवटी आज झाला "त्या" चार चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल*

 


गेवराई, एमबी न्युज वृत्तसेवा......

वाळू उपसा झालेल्या खड्ड्यात बुडून चार ऊसतोड मजुरांच्या मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील शहजाणपूर चकला येथे घडली होती सदरील घटना ही  रविवारी रात्री उशीरा  उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली होती. तर गेवराई तालुक्यातून होणारा अवैध वाळू उपसा प्रश्न पुन्हा एकदा  ऐरणीवर आला होता. याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी देखील  गंभीर दखल घेऊन चौकशी समिती नियुक्त केली होती. त्यानुसार या समितीने अहवाल देताच मयत मुलांच्या वडिलांच्या फिर्यादीवरून चार वाळू माफियांविरोधात मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेवराई तालुक्यातील मादळमोही जिल्हा परिषद गटातील शहाजानपूर चकला हे सिंदफना काठावरील गाव आहे. या ठिकानाहून नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत होता म्हणून या ठिकाणी ठिक ठिकाणी  खड्यात पाणी साचलेले आहे. याच पाण्यात बुडून शहाजानपूर येथील बबलू गुणाजी वक्ते, गणेश बाबुराव इनकर, आकाश राम सोनवणे आणि अमोल संजय कोळेकर या नऊ ते बारा वर्षे वयाच्या बालकांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला होता. ही घटना घडल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले असून जोपर्यंत वाळू उपसा करणाऱ्या लोकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतल्याने या ठिकाणी  मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.तसेच सदरील घटनेनंतर हद्दीबाबत महसूल प्रशासन मात्र ऐकमेकांकडे बोट दाखवायला सुरूवात केली होती.तर दोषींवर कठोर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन बीड-गेवराई महसूल व पोलिस प्रशासनाने दिल्यानंतर मुलांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले होते.

तसेच या प्रकरणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गंभीर दखल घेतली होती.  जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी चौकशी समिती नेमली होती. या समितीचा अहवाल येताच या प्रकरणी मयत मुलांच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पांडूरंग चोरमले, विलास निर्मळ, संदीप निर्मळ व आर्जुन कोळेकर (सर्व रा.तांदळवाडी) यांच्या विरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि संदीप काळे हे करत आहेत.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार