MB NEWS- *बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या हस्ते गणेश जयंती निमीत्त गणेशपारावरील "श्रीं"ना अलंकार अर्पण*

 *बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या हस्ते गणेश जयंती निमीत्त गणेशपारावरील "श्रीं"ना अलंकार अर्पण* 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

     गणेश जयंतीनिमीत्त गणेशपार येथील प्राचीन आराध्य दैवत गणेश मंदिर येथे गणरायांच्या मूर्तीला सर्व भक्तमंडळी यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या चांदीचा मुकुट अलंकार माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.

        गणेशपार भागातील गणेश मंदिर म्हणजे प्राचीन आणि जागृत देवस्थान.राज्याचे सामाजिक न्याय व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या सहकार्यातून गणेश मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला आहे.अनेक गणेशभक्त दररोज गणरायाचे नित्यदर्शन घेवूनच आपले कामकाज सुरुवात करतात. दि.४ रोजी गणेश जयंती निमीत्त  चांदीचा मुकुट अर्पण करण्यात आला. या सोहळ्यास नंदुकाका रामदाशी,नारायण देव गोपनपाळे, राजु भंडारी, चारुदत्त करमाळकर, सौ.कडगे, विनोद कौलवार, पत्रकार अनंत उर्फ पप्पू कुलकर्णी,प्रकाश वर्मा, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !