MB NEWS- *सर्व सामान्यांच्या सर्वांगिण विकासाचं हित साधणारा अर्थसंकल्प* - *पंकजाताई मुंडे यांची प्रतिक्रिया*

 *सर्व सामान्यांच्या सर्वांगिण विकासाचं हित साधणारा अर्थसंकल्प* 

- *पंकजाताई मुंडे यांची प्रतिक्रिया*


मुंबई । दिनांक ०१। 

शेती, शिक्षण, तरूणाई, सहकार, महिला आणि आरोग्य क्षेत्राबरोबरच सर्व सामान्यांच्या सर्वांगीण विकासाचं हित साधणारा आजचा अर्थसंकल्प आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.


 सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी हा अर्थसंकल्प मांडला आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार पंकजाताई मुंडे यांनी मानले आहेत. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या योजना, आर्थिक सहाय्य, प्रधानमंत्री आवास योजनेतून शहरी व ग्रामीण भागात घर बांधणी, तरूणांना व्यवसाय उभारणीसाठी नाबार्ड मधून अर्थसहाय्य,  कृषी आधारित नव्या उद्योगांना कर्ज, महिलांसाठी वात्सल्य योजना, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद आदी ठळक वैशिष्ट्य आजच्या अर्थसंकल्पाची आहेत. हा अर्थसंकल्प सर्वसामान्य माणसाच्या हिताचा व कल्याणाचा आहे असं पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार