MB NEWS-बीड जिल्ह्यातील "या" संवेदनशील जेष्ठ पत्रकाराचा होणार छत्रपती शिक्षणसेवा गौरव पुरस्काराने सन्मान

  बीड जिल्ह्यातील "या" संवेदनशील जेष्ठ पत्रकाराचा होणार छत्रपती शिक्षणसेवा गौरव पुरस्काराने सन्मान



प्रतिनिधी | औरंगाबाद


सभांजीनगर जिल्ह्यातील  छत्रपती शिवाजी महाराजांच्या भारतातील तिसऱ्या विचार मंदिर समितीच्या वतीने, दिला जाणारा या वर्षीच्या" छत्रपती शिक्षण गौरव पुरस्कार-२०२२" बीड येथील स्वा.सावरकर शैक्षणिक संकुलातील  शालेय समिती अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आलेला आहे, अशी माहिती श्री. छत्रपती शिवाजी विचार मंदिर शिवतिर्थ जळकीबाजार (ता. सिल्लोड) चे संयाेजक प्रदीप जगताप पाटील यांनी दिली.


संयाेजक पाटील यांनी सांगितले, विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार मंदिर समितीतर्फे केला जाताे. आजपर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले. यामध्ये भास्करराव पा. पेरे , शिवशाहीर विजय तनपुरे, विनोद पाटील,   ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर , सास्ते महाराज यांचा सत्कार करण्यात आला.  संगीताताई व्यवहारे यांनी रचलेली व गायलेल्या छत्रपतींच्या आरतीचे विमोचन याच ठिकाणी झाले आहे.  दरवर्षी समाजसेवा करणाऱ्यांचा गौरव समितीतर्फे केला जातो.  या ठिकाणी वर्षभर कार्यक्रमांची रेलचेल असते. मंदिराच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात . विद्यार्थ्यांसाठी वाचनालय सुरू झाले आहे. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठीही याठिकाणी पुस्तके उपलब्ध करण्यात आली . दरवर्षी  मुलीचे कन्यादान केले जाते. शासकीय योजनांची जनजागृती व्हावी यासाठी व्यापक प्रयत्न मंदिर समितीच्यावतीने केले जातात. याशिवाय गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, दिनदर्शिका प्रकाशन अशा अनेक उपक्रमांचे आयोजन मंदिर समितीमार्फत केले जाते.

यंदाच्या वर्षी स्वा.सावरकर शैक्षणिक संकुलातील बीड शालेय समिती अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार प्रमोद भास्करराव कुलकर्णी यांची समाजाप्रती असलेली तळमळ , व आपल्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, बघता त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या भारतातील तिसऱ्या मंदिरातर्गत, दिला जाणारा या वर्षीच्या छत्रपती शिक्षणसेवा गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.  मंगळवारी (दि. १५)  सायंकाळी ठीक ७ वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. आपल्या हातून नेहमीच आई जगदंबेच्या कृपेने व छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने नेहमीच अधिकाधिक उल्लेखनीय कार्य घडत राहो, अशा शुभेच्छाही या निवड समितीच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

-----

एकत्र कुटुंबाच्या शक्ती चा सन्मान

हा ‘छत्रपती शिक्षण सेवा गौरव’ भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेला शिक्षणातुन राष्ट्र निर्माण कार्यात, छत्रपतींच्या ध्येयवादावर चालताना मिळालेली प्रेरणा आहे , पावती आहे, स्वा.सावरकर शैक्षणिक संकुलातील मुख्याध्यापक, शिक्षक बंधु-सहकारी कर्मचारी, विद्यार्थी, पालक, पदाधिकारी सर्वांचे एकत्र कुटुंबाच्या शक्ती चा सन्मान आहे, एक प्रतिनिधी म्हणून मला खूप अभिमान वाटतो आहे.

- प्रमोद कुलकर्णी, अध्यक्ष शालेय समिती, बीड.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार