MB NEWS-यशवंत विभागीय ऑनलाईन सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर...

  यशवंत विभागीय ऑनलाईन  सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर...

 सिरसाळा (वार्ताहर):- येथील श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयात  भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने 26 जानेवारी रोजी यशवंत विभागीय ऑनलाईन सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, दिल्ली येथील *प्रा.  शरद बाविस्कर* यांचे *भुरा* या  आत्मकथनावर आधारीत यशवंत विभागीय ऑनलाईन सामान्यज्ञान स्पर्धा घेण्यात आली होती.  यामध्ये सर्वप्रथम कुमारी निकिता व्यंकट दंडगुले (बीएससी प्रथम वर्ष श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालय सिरसाळा) 98 गुण घेऊन *प्रथम* क्रमांक पटकाविला असून तीन हजार रुपये रोख रक्कम व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच सर्वद्वितीय क्रमांक हा समान गुण मिळाल्यामुळे विभागून देण्यात आला. अविनाश शंकर पवार (बीए द्वितीय वर्ष श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालय) 94 गुण  आणि यशकुमार अशोकराव मुंडे (बी.ए. व्दितीय वर्ष एस. एस. एस. पी. मंडळ कला महाविद्यालय नांदुरघाट ता.  केज) याने पटकाविला असून त्यांना प्रत्येकी एक हजार रोख रक्कम व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच सर्व तृतीय क्रमांक राम विष्णू गडदे (बी एस्सी आदित्य कृषी कॉलेज बीड) 92 गुण मिलविले आहेत. त्यास  एक हजार रुपये रोख रक्कम व प्रमाणपत्र ही पारितोषिके दिली जाणार आहेत. यशवंत विभागीय ऑनलाईन सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेत यशस्वी व पारितोषिक विजेते विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक रामेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष मा.  व्यंकटरावजी कदम साहेब, सचिव योगेश कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. पी.  कदम, स्पर्धा परीक्षेचे समन्वयक तथा अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.  बालाजी साबळे, परीक्षा संयोजन समिती सदस्य डॉ.  अविनाश कासांडे, डॉ.  ए. व्ही. जाधव,  डॉ. विठ्ठल भोसले,  डॉ.  ज्ञानेश्वर मस्के,  प्रा.  अरुणा वाळके,  डॉ.  चारुशीला पाटील प्रा. अनिस  शेख या सर्वांनी तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक या सर्वांनी अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव केलेला आहे आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !