MB NEWS- *चांदापूर येथे १३ फेब्रुवारी रोजी आठव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन*

 *चांदापूर येथे १३ फेब्रुवारी रोजी आठव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन* 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी

परळी तालुक्यातील वसंतनगर तांडा,मौजे चांदापुर येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही १३ फेब्रुवारी २०२२ रोजी आठव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

या धम्म परिषदेला पुज्य भदन्त उपगुप्त महाथेरो (पुर्णा),पुज्य भिक्खू महाविरो (काळेगाव,अहमदपूर),पुज्य भिक्खू पय्यानंद (लातूर),पुज्य भिक्खू धम्मशील (हिंगोली/बीड) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त स्मृतीशेष शंकरराव जगतकर नगरी,चांदापुर (परळी वै.) येथे ही धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे.कोविड पार्श्वभूमीवर प्रतिबंध लागू असल्यामुळे प्रशासनाकडून उपस्थित राहण्यासाठी कमीत कमी व्यक्तींनाच परवानगी आहे.त्यामुळे धम्म परीषदेला फार गर्दी करता येणार नाही.त्यामुळे उपासकांची गैरसोय होवू नये यासाठी या धम्म परिषदेेचे "सम्यक संकल्प" या पेजवरून फेसबुक लाईव्ह थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.याचा लाभ धम्म उपासकांनी घ्यावा असे आवाहन स्वागताध्यक्ष इंजि.चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले आहे.



तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण जेतवन (ता.परळी जि.बीड) यांच्या वतीने तालुक्यातील चोखामेळा सहकारी सोसायटी,वसंतनगर तांडा,मौजे चांदापूर,ता.परळी येथे रविवार,दिनांक १३ फेब्रुवारी २०२२ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त स्मृतीशेष शंकरराव जगतकर नगरी येथे आठव्या बौद्ध धम्म परिषदेची सुरूवात सकाळी 10 वाजता पंचरंगी धम्म ध्वजारोहणाने होईल.स्वागताध्यक्ष इंजि.चंद्रप्रकाश देगलूरकर हे आहेत.तर या धम्म परीषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनीचे अध्यक्ष एॅड.अनंतराव जगतकर हे असणार आहेत.तर यावेळी आ.संजयराव दौंड यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.तसेच यावेळी प्रमुख अतिथी म्हणून  प्रा प्रदीप रोडे, नालंदा अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर वडमारे,माजी नगरसेवक प्रा.डॉ.विनोद जगतकर यांची उपस्थिती लाभणार आहेत.ज्या उपासकांना धम्म परीषदेला उपस्थित रहावयाचे आहे.त्यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या सर्व निर्देशांचे व जिल्हाधिकारी,बीड यांच्या आदेशानूसार (मास्क,सॅनिटायझर व फिजिकल डिस्टन्स-"दो गज दुरी,मास्क है जरूरी" ) पालन करून तसेच कोविड-१९ लसीकरणाचे दोन्ही डोस पुर्ण केलेले असावेत तसे प्रमाणपत्र किंवा पुरावा सोबत ठेवावा आणि सर्वांनी पांढरे वस्त्र परिधान करूनच धम्म उपासकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.धम्म परिषदेच्या यशस्वितेसाठी तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण जेतवन (ता.परळी वै.जि.बीड) चे पदाधिकारी चंद्रकांत इंगळे,राजेंद्र घोडके,प्रा.गौतम गायकवाड,राहुल घोडके,जगन सरवदे,सचिन वाघमारे,विश्वनाथ भालेराव,सिमा चंद्रकांत इंगळे आणि संयोजन समितीचे बौद्धाचार्य मुरलीधर,सुभाष वाघमारे,माणिक रोडे,मधुकर वेडे,व्यंकट वाघमारे,मिलींद नरबागे,राज जगतकर,प्रा.बी.एस.बनसोडे,किशोर इंगळे,चंद्रकांत बनसोडे,संजय साळवे (पुस),सुरेखा रोडे,अर्जुन काळे,आकाश वेडे,विनोद रोडे,धनंजय जोगदंड,सुशिल इंगळे,शिलाताई जोगदंड,रूक्मीण गोरे,बुद्धकरण जोगदंड,संजय जोगदंड संजय सिंगणकर,सुहासिनी इंगळे,स्वप्नील रोडे,बंडू इंगळे,विजय हजारे,धम्मानंद मस्के तर प्रसिध्दी प्रमुख प्रा बालाजी जगतकर  आदींनी पुढाकार घेतला आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार