इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-आजचे राशिभविष्य दि.१० मार्च २०२२

 आजचे राशिभविष्य दि.१० मार्च २०२२



मेष : खर्चावर नियंत्रण ठेवा, आर्थिक नियोजनाचा अभाव संभवतो, प्रतिक्रिया देताना कोणालाही वाईट वाटणार नाही याची काळजी घ्या. वस्तू सांभाळून ठेवा.


वृषभ :  कामे पूर्ण होतील, मनासारख्या घटना घडतील, मित्रमंडळींचा सहवास लाभेल, अलंकार, वस्त्र, मनासारखी खरेदी कराल. धंद्यात नुकसान होईल.


मिथुन :  नको त्या गोष्टींना अवास्तव महत्त्व देऊ नका, प्रतिक्रिया देताना काळजी घ्या, जामीन राहू नका, आत्मचिंतनाची गरज आहे.

कर्क :  चिकाटीने व आत्मविश्वासाने व्यवसायात यश मिळेल, लोकांपर्यंत आपले काम पोहोचेल. लाभदायक दिवस. व्यावहारिक चातुर्याने यशस्वी व्हाल.


सिंह : प्रयत्नांना यश मिळेल, कामाचे कौतुक होईल, वरिष्ठांची मर्जी राखाल, कुटुंबीयांसाठी वेळ द्याल. सांस्कृतिक कार्यात सहभागी व्हाल.


कन्या :  आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, नियमांचे पालन करा, मनाविरुद्ध घटना घडतील, आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.


तूळ :  मानसिक व शारीरिक आरोग्य सांभाळा, लोक काय म्हणतील याचा विचार न करता योग्य निर्णय घ्यावा. नको तेच विषय समोर येतील, संयम ठेवणे गरजेचे.


वृश्चिक :  कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील, अभ्यास व सहकार्‍यांच्या साथीने आर्थिक उन्नती होईल.


धनु :  नोकरीत पदोन्नतीचे योग, आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस, मध्यस्थी करून संतुलन साधल्यामुळे प्रतिष्ठा वाढेल. नव्या संधी चालून येतील.


मकर :  मानसिकता व दृष्टिकोन सकारात्मक ठेवणे गरजेचे आहे, कामाला प्राधान्य द्या, गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस, संवादाने प्रश्न सोडवावे लागतील.


कुंभ :  नियोजित कामांत अडचणी येतील, क्रोधावर नियंत्रण ठेवा, आत्मविश्वास कमी होईल, आत्मचिंतनाची गरज आहे. निष्काळजीपणा मनःस्ताप देऊ शकतो.


मीन :  कलाकार, लेखकांना प्रोत्साहन मिळू शकेल, आर्थिक प्रगती होईल, धनप्राप्तीचे योग, नव्या मित्रमंडळींची ओळख होईल, एकंदरीत लाभदायक दिवस.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!