MB NEWS-परळीची भूमिकन्या अपर्णा नेरलकर नांदेड महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापतीपदी

 परळीची भूमिकन्या अपर्णा नेरलकर नांदेड महापालिके च्या महिला व बालकल्याण सभापतीपदी











परळी/प्रतिनिधी

परळीची भूमिकन्या असलेल्या अपर्णा ऋषिकेश नेरलकर यांची नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. अपर्णा नेरलकर या नांदेडमधील भाग्यनगर प्रभागातील काँग्रेसच्या नगरसेविका आहेत. तर अ. भा. नाट्य परिषदेच्या नांदेड शाखेच्याही अध्यक्षा आहेत. परळीतील विठ्ठल मंदिराशेजारचे श्री. अंबादासराव देशपांडे यांच्या त्या द्वितीय कन्या आहेत.

नांदेड महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. पालिकेवर सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. महापालिकेत महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी काँग्रेसमधील अनेक नगरसेविकांनी मोर्चेबांधणी केली होती. अखेर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नगरसेविका म्हणून सलग दुसऱ्यांदा निवडून येऊन नेतृत्वाची चुणूक आपल्या कामकाजातून दाखवणाऱ्या अपर्णा नेरलकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

नांदेडमध्ये नेरलकर घराणे व्यवसायातले बडे प्रस्थ असून राज्याचे विद्यमान सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे समर्थक आहेत. नांदेड महापालिकेत महिला व बालकल्याण सभापतीपदाची निवड २५ मार्च रोजी निश्चित केलेली होती. मात्र तत्पूर्वीच अपर्णा नेरलकर यांची बिनविरोध निवड झाली. 

परळीच्या गणेशपार भागातील विठ्ठल मंदिराशेजारचे श्री. अंबादासराव देशपांडे यांची कन्या असलेल्या अपर्णा यांचे शालेय शिक्षण वैद्यनाथ विद्यालयात झालेले आहे. वैद्यनाथ विद्यालयाची स्थापना साधारण ७५ वर्षांपूर्वी ज्या मोजक्या मान्यवरांनी पुढाकार घेऊन केली त्यापैकी एक होते, (कै.) अॅड गंगाधरराव उपाख्य साहेबराव देशपांडे ! अॅड. साहेबराव हे १९५०-६० च्या दशकात गंगाखेड येथे वकिली करत असत. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातही सहभाग नोंदवलेला होता. केंद्र आणि राज्याच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या यादीतही त्यांची नोंद आढळते. अॅड. साहेबराव देशपांडे यांचे बंधू डॉ. जीवनराव देशपांडे हे ही स्वातंत्र्यसैनिक होते. डॉ. जीवनराव देशपांडे वैद्यनाथ देवल कमिटीवर दीड तप पदाधिकारी होते.

दिवंगत अॅड. साहेबराव देशपांडे यांची नात, तर श्री. अंबादासराव देशपांडे यांची कन्या, तसेच परळीतील प्रथम एमडी. डॉक्टर जे. जे. देशपांडे यांची अपर्णा नेरलकर या पुतणी आहेत.

••••••••••••••••••••••••••••••••

🔸हे देखील वाचा/पहा🔸

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Click -🔸 *तुकाराम बीज ✍️ भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र(बाळु) महाराज उखळीकर यांनी केलेले प्रासंगिक चिंतन.....! 👉⭕ *"तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा......!"*⭕

Click -लक्षवेधी: जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सवात मुलींनी दाखवली मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके

Click -🏵️ *आला होळीचा सण,लय भारी:* *’लेंगी’च्या पारंपरिक बंजारा गीतांवर थिरकली पाउले!*

Click -🏵️ *पंकजाताई मुंडे यांनी दत्तक घेतलेल्या उदयोन्मुख गायिकेच्या मधुर आवाजाची एक झलक......!*

Click -🏵️होळी पेटवून का मारल्या जातात बोंबा?? घ्या जाणुन.*

Click -☘️ *पळसाला पाने तीन अन् फुलाचे रंग दोन! काय आहे पळस व होळीचा संबंध? पळसपापडी माहिती आहे का?-बघा.*☘️

Click -⭕ *मंत्री धनंजय मुंडे यांची आज की 'बात'.....'इशारो ही इशारों में!'*

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••          जाहिरात/ADVERTIS

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

































 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !