MB NEWS-आजचे राशिभविष्य दि.३ मार्च २०२२
आजचे राशिभविष्य दि.३ मार्च २०२२
मेष ःव्यावसायिक उत्कर्ष होईल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. आनंददायी घटना घडतील. प्रेम प्रकरणात यश मिळेल. प्रवासाचे योग.
Click -🏵️ *चला दर्शनाला....परळीत प्रभु वैद्यनाथांच्या पालखीचे प्रस्थान* 🔸
वृषभः विवाहासंबंधित आनंद वार्ता येईल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. व्यावसायिक उन्नती होईल. कामाचे कौतुक होईल.
मिथुन ः द्विधा मनःस्थितीत निर्णय घेणे कठीण जाईल. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. धार्मिक कामात सहभाग घ्याल. संयम आवश्यक आहे.
कर्क ः अयोग्य पद्धतीने केलेल्या कामाचा पश्चाताप होईल. मनाविरुद्ध घटना घडतील. मनःस्ताप होण्याची शक्यता. आर्थिक नियोजन आवश्यक आहे.
सिंह ः भागीदारीत लाभ होईल. जीवलगांचा सहवास लाभेल. प्रवासाचे योग. कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल. जोडीदाराची साथ लाभेल.
कन्या ः शत्रूंवर मात कराल. नोकरदारांसाठी लाभदायक दिवस. आर्थिक प्रगती होईल. पदोन्नतीचे योग. मातुल घराण्याचे सहकार्य लाभेल.
तूळः मोठे धाडस करू नका. प्रेम प्रकरणात अपयश संभवते. निर्णय घेताना सावधानता बाळगा. संयम आवश्यक आहे.
वृश्चिक ः क्रोधावर नियंत्रण आवश्यक आहे. कौटुंबिक अस्वास्थ्य राहील. कोणालाही शब्द देऊ नका. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका.
धनु ः स्वप्नपूर्तीचा दिवस. छोटे प्रवास घडतील. कलाकार व लेखकांना आर्थिक लाभ होतील. जवळच्या लोकांची मदत होईल. आर्थिक प्रगती होईल.
मकर ः कौटुंबिक जबाबदारी वाढेल. जबाबदारीची जाणीव होईल. व्यावहारिक सतर्कता महत्त्वाची आहे. मनःस्वास्थ्य बिघडवणार्या घटना घडतील.
कुंभ ः मन प्रसन्न राहील. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. मनासारख्या घटना घडतील. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. अतिथ्यात दिवस जाईल
मीन ः स्पर्धा मनःस्ताप देणारी ठरेल. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता. कोणालाही शब्द देऊ नका. कर्ज प्रकरणात अडचणी येतील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा