MB NEWS-सत्तावीस कट्टयाच्या हरभरा थप्पीतून सहा कट्टे चोरुन नेले
सत्तावीस कट्टयाच्या हरभरा थप्पीतून सहा कट्टे चोरुन नेले
परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
एका शेतकऱ्याने आपल्या शेतात मळणी करुन हरभरा कट्ट्यावर भरुन थप्पी लावून ठेवली होती.सत्तावीस कट्टे असताना त्यापैकी सहा कट्टे चोरीला गेल्याचे लक्षात आले.याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, फिर्यादी बप्पासाहेब अण्णासाहेब पवार रा.पुस या.अंबाजोगाई यांच्या शेतात हरभरा काढुन पोते भरुन थप्पी लावून ठेवली होती.यामध्ये एकुण सत्तावीस कट्टे होते.दि.१३ रोजी दुपारी झाकलेली ताडपत्री काढून घेतला असता या थप्पीतुन सहा कट्टे गायब झाले असल्याचे दिसून आले.चोरी झालेल्या हरभर्याची किंमत १८,७२० इतकी आहे.याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोह शेख हे करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा