इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-महसुलचे अधिकारी पक्षपातीपणे काम करतात -बहादूरभाई

 महसुलचे अधिकारी पक्षपातीपणे काम करतात -बहादूरभाई 




परळी l प्रतिनिधी

परळी तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी पक्षपाती काम करत आहेत. काँग्रेस पक्षाने राबवलेले उपक्रम चोरून इतर पक्ष त्या उपक्रमांचे श्रेय मतांसाठी घेत आहेत. त्याचबरोबर एका पक्षाचीच कामे केली जात असून इतरांना डावलण्यात येत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष बहादूरभाई यांनी केला. काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात शुक्रवारी पत्रकार परिषद घेण्यात आली याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.

Click &Watch:🏵️ *"वात्सल्य शिल्प"*🏵️ *_आपल्या आवती भवती बघा नक्की नैसर्गिक कलाकृती आढळतील._* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने परळीत पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत महसूल प्रशासन आणि सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून शहरातील रेशन कार्डधारकांच्या मुद्यावर काँग्रेसकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. धान्य न उचलणाऱ्या कार्डधारकांची नवे वगळून ज्यांना धान्य मिळत नाही त्यांना देण्यात यावे यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र काँग्रेस पक्षाकडून करण्यात येणाऱ्या कामांची महसुलच्या अधिकाऱ्यांकडून अडवणूक करण्यात येत असून एकाच पक्षाची कामे तहसीलमध्ये केली जातात. रेशन कार्ड ऑनलाईन करण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. चार नायब तहसीलदाराचे काम एकाच नायब तहसीलदारावर होत आहे. इतर पद भरली जात नसून, आम्ही राबवलेले उपक्रम चोरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मतं मिळवण्यासाठी ते उपक्रम राबवत आहे आणि त्याला तहसीलदार सहकार्य करत आहेत. हा पक्षपातीपणा आहे असे काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूरभाई यांनी सांगितले. काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष बहादूरभाई, सरचिटणीस शिवाजीराव देशमुख, जेष्ठ नेते गणपतअप्पा कोरे, अनु.जाती शहराध्यक्ष दीपक शिरसाट, चिटणीस शशिशेखर चौधरी, उपाध्यक्ष अशोकराव कांबळे, ऐतेशाम खतीब, परळी विधानसभा अध्यक्ष रणजित देशमुख, युवक शहराध्यक्ष धर्मराज खोसे, गुलाबराव देवकर, बद्दरभाई, समंदर खान पठाण, सुभाषराव देशमुख आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!