MB NEWS-वाहतूक नियमांची पायमल्ली करणारांवर परळीत पोलीसांची दंडात्मक कारवाई

 वाहतूक नियमांची पायमल्ली करणारांवर परळीत पोलीसांची दंडात्मक कारवाई



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

        विना लायसन्स, विना हेल्मेट गाडी चालवणे, सीटबेल्ट न वापरणे, फॅन्सी नंबरप्लेट वापरणे, मोटार सायकल वरून ट्रिपल सीट फिरणे अशा वाहतूक नियमांची पायमल्ली करणारांवर परळी शहरात पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू केली आहे.

     परळी शहरातील एकमिनार चौक तसेच मौलाना अबुल कलाम आझाद चौकात पोलीस रस्त्यावर उभे राहून कारवाई करत आहेत.मार्च महिन्यात वेगवेगळ्या दंड आकारणीतून 50 हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. दररोज पोलीस रस्त्यावर असून, दंडरक्कम वसुली मोहीम जोरात राबविली जात आहे. शासकीय नियमानुसार नियमबाह्य वाहन चालवणाऱ्या वाहचलकांकडून दंड आकारला जात आहे.


हेल्मेट वापरणे, सीटबेल्ट लावणे हे आपल्या सुरक्षेसाठीच असून, रस्ता सुरक्षेच्या नियमांचे पालन केल्याने आपला जीव सुरक्षित राहू शकतो. त्यामुळे नियम पाळा आणि अपघात टाळा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.या मोहिमेवर पो हे. नितीन शिदे. पो.अंं. सिध्दात गोरे होमगार्ड गुद्दे.डापकर,गित्ते आदी कर्मचारी कामगिरी बजावत आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार