MB NEWS-पंकजाताई मुंडे प्रभारी झाल्यानंतर प्रथमच सांगलीत ; कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत

 पंकजाताई मुंडे प्रभारी झाल्यानंतर प्रथमच सांगलीत ; कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत



संघटनात्मक दृष्टया  भाजपला ताकदीने पुढे घेऊन जावू -पंकजा मुंडे


सांगली ।दिनांक ०७।

भाजपचा नेहमीच अन्यायाच्या विरोधात लढण्याचा पिंड आहे, त्यामुळे लोकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी भाजप नेहमीच रस्त्यावर असतो. रस्त्यावर उतरणारा आणि संघटनेत काम करणारा कार्यकर्ता यांच्यात सांगड घालत  संघटनात्मक बांधणीवर जोर देऊन भाजपला ताकदीने पुढे घेऊन जावू असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी येथे सांगितले. 

Click:कोल्हापूर दौऱ्यावर असणार्‍या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत !*

   सांगली व कोल्हापूरच्या प्रभारी म्हणून निवड झाल्यानंतर पंकजाताई मुंडे प्रथमच सांगली दौऱ्यावर आल्या होत्या, यावेळी  आ. सुधीर गाडगीळ यांच्या संपर्क कार्यालयाला त्यांनी भेट दिली तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी त्यांच्या हस्ते वाहनावर लावण्यात येणाऱ्या स्टिकर्सचे अनावरण करण्यात आले.

Click:*संघटनात्मक दृष्टया भाजपला ताकदीने पुढे घेऊन जावू -पंकजा मुंडे*

 पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, यापूर्वी मी अनेकदा विविध भूमिकेतून जिल्ह्यात येऊन गेले आहे पण प्रभारी म्हणून मी प्रथमच आले आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. भाजपची स्थापना झाल्यापासून मध्यप्रदेशात असणारे संघटन आदर्श आहे. भाजपचा नेहमीच अन्यायाच्या विरोधात लढण्याचा पिंड आहे. त्यामुळे लोकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी भाजप नेहमीच रस्त्यावर असतो. रस्त्यावर उतरणारा आणि संघटनेत काम करणारा यांच्यात सांगड घालून काम करायचे आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी येथे अनेकांना जोडण्याचं काम केलंय, त्यामुळे त्यांच्यासारखे येथे काम करण्याचे मोठे आव्हान आहे, तसेच अभिमानाचेही काम आहे, आपण सर्व दबंगपणे काम करून पुन्हा ताकतीने उभा राहू  असेही त्या म्हणाल्या. 

Click:🔸 *GOOD NEWS: नीट(NEET) परिक्षेची तारीख जाहीर*

  यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी मी स्व. मुंडे साहेबांमुळेच सक्रिय राजकारणात आलो. मी प्रत्यक्षात राजकारणात येण्यापूर्वी गाडगीळ कुटुंब नेहमीच पडद्यामागे होते तसेच सांगलीला आले की मुंडे साहेब माझ्याकडे मुक्कामाला येत असत असे सांगितले. यावेळी पंकजाताई मुंडे यांची सांगली जिल्हा प्रभारी पदी निवड झाल्याबद्दल स्वागत व अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या तसेच वाढदिवसाबद्दल आ. सुधीर गाडगीळ यांचा पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

Click:राज्यातील सरकार महा आघाडीचे नाही तर 'महा बिघाडी'चे -पंकजाताईंचा घाणाघात*

 यावेळी सांगली शहर जिल्हाध्यक्ष दिपक शिंदे, आ. गोपीचंद पडळकर,  प्रदेश सदस्य नीता केळकर, प्रकाश बिरजे, श्रीकांत शिंदे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष स्वाती शिंदे,  विनायक सिंहासने, जि.प. उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार