MB NEWS-फुलचंद कराड यांना स्टार महाराष्ट्राचे पुरस्कार जाहीर शनिवारी पनवेल मध्ये होणार वितरण

 फुलचंद कराड यांना स्टार महाराष्ट्राचे पुरस्कार जाहीर



शनिवारी पनवेल मध्ये होणार वितरण

परळी/प्रतिनिधी

भगवान सेनेचे सरसेनापती तथा भाजपाचे जेष्ठ नेते फुलचंद कराड यांना एमसीएम टीव्ही व श्री साईसागर इंटरमेंट नवी मुुंबईच्या वतीने देण्यात येणारा स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार जाहीरझाला असून शनिवार दि.9 एप्रिल रोजी पनवेल येथे पुरस्काराचे वितरण होणार आहे. दरम्यान या पुरस्काराबद्दल कराड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

भगवान सेनेचे सरसेनापती तथा भाजपाचे जेष्ठ नेते फुलचंद कराड यांना 2022 या वर्षाचा स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. एमसीएम टीव्हीच्या वतीने हा पुरस्कार दिला जात असून मुख्य संपादक जनार्धन शिंदे यांनी याबाबतचे पत्र फुलचंद कराड यांना दिले आहे. सामाजिक, राजकिय कार्याची दखल घेत तसेच ओबीसी आरक्षण, उद्योग तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे परिक्षण करून हा पुरस्कार फुलचंद कराड यांना दिला जात आहे.शनिवार दि.9 एप्रिल रोजी सकाळी 10 वा. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाटय गृह, नवी मुंबई, पनवेल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.


दरम्यान मला मिळणारा पुरस्कार हा मी आपल्या सर्वांसाठी करीत असलेल्या सामाजिक कार्याचा गौरव असून आपली दखल घेवून चळवळीत काम करणार्‍या कार्यकर्त्यांना समाज राजमान्यता देतो या शब्दात फुलचंद कराड यांनी पुरस्काराचे अभिनंदन करून त्याबद्दल एमसीएम टीव्ही चे आभार व्यक्त केले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार