MB NEWS-चार एक्कर ऊस आगीत भस्मसात

 चार एक्कर ऊस आगीत भस्मसात



परळी वैजनाथ, प्रतिनिधी..

उन्हाची तीव्रता वाढल्याने उष्णतेत प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशातच आगी लागण्याचे प्रकारही घडू लागलेत. परळी तालुक्यातील मौजे इंजेगाव येथे आज मंगळवारी ऊसाच्या फडाला आग लागली. शेतकऱ्यांचा तब्बल चार एक्कर ऊस जळून खाक झाला आहे. दुपारच्या सुमारास आग लागल्याने विझवणे अशक्य झाले होते. 

Click: परळी शिवारात विहिरीत आढळला मृतदेह

इंजेगाव येथील शेतकरी श्रीराम गंगाराम कराड व नवनाथ श्रीराम कराड या शेतकऱ्यांच्या उसाला भीषण आग लागली. ऊसाचे क्षेत्र यंदा अतिरिक्त झाल्याने मार्च महिना सरून एप्रिल आला तरीही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर ऊस शिल्लक आहेत. इंजेगाव येथील कराड यांचा ऊस आगीत खाक झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

Click:*परळीत ६ मे रोजी ब्राह्मण बहुद्देशीय सभेचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा!* *_नावनोंदणीसाठी संपर्क साधावा – ब्राह्मण सभा_*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !