MB NEWS-प्रा. तपस्या गणेशलाल परदेशी-गुप्ता यांना नांदेड विद्यापीठाची डॉक्टरेट प्रदान

 प्रा. तपस्या गणेशलाल परदेशी-गुप्ता यांना नांदेड विद्यापीठाची डॉक्टरेट प्रदान



अंबाजोगाई: येथील बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड आयटी महाविद्यालयातील  प्राध्यापिका श्रीमती तपस्या गणेशलाल परदेशी-गुप्ता यांना नांदेडच्या  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने  वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखे  अंतर्गत वाणिज्य या विषयात नुकतीच डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली. 

      “परळी औष्णिक वीज निर्मिती कंपनीचा अभ्यास  जिल्हा- बीड”. या विषयावर त्यांनी संशोधन केले. संशोधनासाठी त्यांना कै. रमेश वरपूडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोनपेठ येथील वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाचे संशोधन मार्गदर्शक  प्रा. डॉ. अशोक उर्फ इंद्रजीत चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.  प्रा. तपस्या गणेशलाल परदेशी-गुप्ता यांनी त्यांचा संशोधन प्रबंध विद्यापीठाला सादर केला होता. विद्यापीठात नुकत्याच झालेल्या मौखिक परीक्षेमध्ये त्यांना ही डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे वाणिज्य व व्यवस्थापन मंडळाचे अधिष्ठाता प्राचार्य डॉक्टर वसंतरावजी भोसले सर,  डॉ. संजयजी अग्रवाल, प्रोफेसर डॉ. महेशजी डाबरे एलआरटी कॉमर्स कॉलेज अकोला तसेच प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यशाबद्दल प्रा. तपस्या गणेशलाल परदेशी -गुप्ता यांचे बालाजी शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन   राजकिशोरजी मोदी,संकेत मोदी , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एच थोरात, अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.फुलारी ,डाॅ.तरके,चंद्रशेखर गुप्ता, डाॅ कल्याण गोलेकर, डाॅ.सागर कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे.प्रा. तपस्या गुप्ता यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

हे देखील वाचा/पहा🔸

क्लिक करा: 🏵️ *अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करा मागणी घेऊन आंदोलन: यावेळी परळीत नेमकं घडलं असं की.......*

क्लिक करा: 🌑 *दुर्दैवी: वडिलांना घरातून हाकलून देण्यासाठी मुलाकडूनच शिवीगाळ व मारहाण; परळीतील घटना*

क्लिक करा: ⭕ *विजेच्या प्रश्नावर सिरसाळा येथील विज वितरणच्या अधिकाऱ्यास माकप चा घेराव*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार