MB NEWS-सावता महाराज प्रवेद्वाराचे उद्घाटन

 परळीत भव्य मिरवणुक,प्रबोधन कार्यक्रमाने ज्योतिबा फुले जयंती साजरी



संत सावता महाराज प्रवेद्वाराचे उद्घाटन ; प्रा.शितल कानडे यांच्या  एकपात्रीतुन प्रबोधन 

परळी (प्रतिनीधी)

 महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतिने सोमवार दि.11 रोजी फुले जयंतीनिमित्त समाजातून वर्गणी करत उभारलेल्या संतश्रेष्ठ सावता महाराज प्रवेद्वाराचे उद्घाटन व भव्य मिरवणुक काढण्यात आली.संत सावतामाळी महाराज मंदिर येथे झालेल्या प्रबोधन कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सुरु केलेल्या शिक्षणाच्या चळवळीमुळे आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत.देशाच्या पंतप्रधानापर्यंतची जबाबदारी महिलांनी सांभाळली आहे.सावित्री तुझी मुले,सावित्री तुझी फुले हा विचार प्रत्येक घरात पोंहचला असल्याचे सांगत प्रा.शितल गोरे- कानडे यांनी ज्योती झाली ज्वाला या एकपात्रीतुन फुले दाम्पत्याचे कार्य साकारत प्रबोधन केले.

 महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतिने सोमवार दि.11 रोजी संत सावतामाळी मंदिरात जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर प्रा.नरहरी काकडे,पोउपनि.चाँद मेंडके,माळी सेवा समाजाचे अध्यक्ष बाळासाहेब काळे,सचिव चंद्रप्रकाश लोखंडे,पत्रकार राजेश साबने,दत्तात्रय काळे,महादेव शिंदे,मधुकर निर्मळ आदींची उपस्थिती होती.यावेळी प्रा.शितल गोरे- कानडे यांनी ज्योती झाली ज्वाला या एकपात्रीतुन ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकुल परिस्थितीत स्त्री शिक्षणास सुरुवात केली.त्यांच्या या कार्यामुळे आज महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत असे सांगीतले.



याप्रसंगी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अंगद माळी व पदाधिकार्यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.सायंकाळी सहा वाजता पारंपारीक वाद्यांच्या गजरात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची मिरवणुक काढण्यात आली.

Click -व्हिडिओ पहा:🏵️ *परळीत महात्मा जोतिबा फुले जयंतीची जल्लोषात मिरवणूक.* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

सावतामाळी मंदिर येथुन निघालेली ही मिरवणुक राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात आल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,वैजनाथ सोळंके,गोपाळ आंधळे,शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे,शहरप्रमुख राजेश विभुते,देविप्रसाद पांडे,रमेश चौंडे,भाजपाचे ॲड.अरुण पाठक,योगेश पांडकर,माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर,दासु वाघमारे आदींनी स्वागत केले. म.फुले जयंतीचे हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  शिवाजी लोखंडे,  राजकुमार डाके,हनुमंत आगरकर, अरुण भाऊ शिंदे,दत्ता लोखंडे गणेश लोखंडे,नेताजी लोखंडे,शिवा बनसोडे,सखाराम बनसोडे महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अंगद माळी उपाध्यक्ष चक्रधर शिंदे,अभिनव लोखंडे,गणेश बोराटे,गौरव पाथरकर,आदिनाथ बनसोडे,कृष्णा शिंदे,अभिषेक शिंदे रोहन लोखंडे,नागेश खेत्रे,निखिल लोखंडे,गजानन लोखंडे,शुभम बनसोडे,राम भालेकर,अमर करपुडे, आकाश जाबळे,सतीश लोखंडे दशरथ भोकरे,चक्रधर डाकेरमेश बनसोडे,बालाजी बनसोडे नरहरी बनसोडे,सतिश गोरे आदींनी परिश्रम घेतले.

@@@@@

सावता महाराज प्रवेद्वाराचे उद्घाटन

 महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त गणेशपार रोडवर समाजातुन वर्गणी करत उभारण्यात आलेल्या संतश्रेष्ठ सावता महाराज प्रवेद्वाराचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन तसेच मिलींद विद्यालयासमोरील चौकाचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असे नामकरण करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !