MB NEWS-१२ शेळ्या नेल्या चोरुन;७२ हजाराचा अर्थिक फटका

 १२ शेळ्या नेल्या चोरुन;७२ हजाराचा अर्थिक फटका



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... 

        पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेल्या शेळ्या रात्रीतून गायब झाल्याने शेळीपालनकर्ता हवालदिल झाला आहे.या चोरीत या शेळीपालनकर्त्याला अंदाजे७२ हजाराचा अर्थिक फटका बसला आहे.याप्रकरणी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस पुढील तपास करीत आहेत.

     फिर्यादी कैलास मल्हारी खंडागळे रा.आंबेडकरनगर परळी यांनी ०३/०४/२०२२ रोजी शेळ्या चारून आणुन रात्री ०६.०० च्या दरम्यान घरासमोरील मोकळया पटांगणामध्ये बांधल्या. रात्री ९ वा. चे सुमारास शेळया मोकळ्या पञ्याचे शेड मधे रूम मधे बांधुन समोरच्या रूम मधे झोपी गेले. दि. ०४/०४/२०२२ रोजी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास  शेळ्या बांधलेल्या ठिकाणी दिसुन आल्या नाहीत. ईकडे तिकडे ,शेजारी पाजारी यांच्याकडे चौकशी केली आसता मिळुन आल्या नाहीत. बारा शेळया कोणी तरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्या. शेळीची प्रत्येकी किंमत ६००० / रू प्रमाणे कुण ७२०००/रू.या शेळया चोरून नेल्या प्रकरणी  अज्ञात चोरटयाविरूध संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोह चौधरी हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !