परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
हादरवून टाकणारी घटना! बिल्डर बियाणी यांचा दिवसा ढवळ्या गोळ्या घालून खून
नांदेड, : नांदेड येथील प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्यावर मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास राहत्या घराजवळ गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांनी अगदी जवळून पाठीमागून त्यांच्यावर पिस्तलमधून चार गोळ्या झाडल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. एक गोळी त्यांच्या डोक्यातून आरपार गेली.
संजय बियाणी हे जेवनासाठी घरी आले होते. आपल्या वाहनातून उतरून घरात जात असताना दबा धरून बसलेल्या चार हल्लेखोरांनी काही कळण्याच्या आतच त्यांच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या. घटनास्थळी प्रचंड रक्तस्राव झाला. तेथील काही जणांनी त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर उपचार करत होती. त्यांचा वाहन चालक रवी याच्याही खांद्यावर एक गोळी लागली असून त्याच्यावरही त्याच रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान पोलिसांनी बियाणी यांच्या घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असून हल्लेखोरांना शोधण्यासाठी पथके पाठविली आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी आणि पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी रुग्णालयात येऊन डॉक्टर आणि बियाणी यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा