इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-तिघांसाठी काळरात्र: कारचा भिषण आपघात; तीन ठार-तीन जखमी

 तिघांसाठी काळरात्र: कारचा भिषण आपघात; तीन ठार-तीन जखमी



रस्त्याच्या कडेला  बोलत उभे असलेल्या चौघांना अंबाजोगाईच्या दिशेने जात असलेल्या भरधाव कारने 4 जणांना चिरडल्याची घटना घाटनांदुर ( ता. अंबाजोगाई ) येथे सोमवारी ( दि. ४ ) रात्री १० च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली. यामध्ये दोघे जागीच ठार तर एकाचा लातूर येथे घेऊन जाताना रस्त्यात मृत्यू झाला. एक जण गंभीर असून कार मधील दोघे जखमी आहेत.

वैभव सतीश गीरी ( वय १७ वर्ष ) लहू बबन काटुळे ( वय ३० वर्ष ) असे जागीच ठार झालेल्या दोघांची नावे असून, रमेश विठ्ठल फुलारी ( वय ४७ ) असे लातूर येथे घेऊन जाताना मृत्यू झालेल्या जखमीचे नाव आहे.‌ तसेच उध्दव निवृत्ती दोडतले हे गंभीर जखमी आहेत. हे चौघेही सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका टपरी समोर उभे होते. यावेळी अंबाजोगाईच्या दिशेने कार क्रमांक एम.एच. २४ व्ही २५१८ ही भरधाव वेगाने आली. चौकात येताच चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती सरळ या चौघांवर येऊन धडकून फरफटत नेले. पुढे विद्युत खांबाला धडकून कार थांबली. अपघात घडताच ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली परंतु वैभव गिरी व लहू काटुळे हे जागीच ठार झाले होते तर रमेश फुलारी आणि उध्दव दोडतले हे गंभीर जखमी होते. या दोघांनाही तातडीने अंबाजोगाई येथे हलविण्यात आले. रमेश फुलारी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले. लातूर येथे जाताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. एका अपघाताने तिघांचा बळी गेला आहे. दोडतले हे गंभीर जखमी आहेत. तसेच कार मधील दोघे जखमी आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!