परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
पाडव्या दिवशी हत्या झालेल्या पुरोहित संतोष पाठक कुटुंबियांचे भाजपनेत्या पंकजा मुंडे यांनी केले सांत्वन
अंबाजोगाई - शहरालगत असलेल्या शेपवाडी येथील हनुमान मंदिर येथे पोरोहित्य करणारे संतोष दासोपंत पाठक (वय ५०, रा. रविवार पेठ, अंबाजोगाई) यांचा ऐन पाडव्यादिवशी शनिवार (दि.०२) दुपारी १ वाजता चाकूने भोसकून खून करण्यात आला अतिशय धक्कादायक व खळबळजनक घटनेने या कुटुंबांवर काळ कोसळला आहे. भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज अंबाजोगाई दौर्यावर असताना पाठक कुटुंबियांचे घरी जाऊन सांत्वन केले.
संतोष पाठक यांच्यावर चाकूने अनेक वार करण्यात आले व त्यात ते मृत्युमुखी पडले.या घटनेने मोठी खळबळ उडाली. पौरोहित्य करुन उदरनिर्वाह करणारे कुटुंब उघड्यावर आले.या घटनेने समाजाच्या सर्व स्तरातून शोकभावना व्यक्त होत आहेत.भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज अंबाजोगाई दौर्यावर असताना पाठक कुटुंबियांचे घरी जाऊन सांत्वन केले.यावेळी अक्षय मुंदडा, राम कुलकर्णी आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा