इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS- स्व. चंद्रकला लाड स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व प्रा. मधू जामकर यांचा झाला सत्कार

 स्व. चंद्रकला लाड स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व प्रा. मधू जामकर यांचा झाला सत्कार 



परळी वैजनाथ ,दि. ०६ / ० ४ /२०२२ (प्रतिनिधी )

     मराठवाडा साहित्य परिषद परळी शाखेच्या वतीने 2022 या वर्षापासून स्व.चंद्रकला लाड स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येत आहे. या पुरस्काराचे यावर्षीचे मानकरी सोपान हाळमकर यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  वैद्यनाथ औद्योगिक वसाहत सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. मधु जामकर यांचा अभिष्टचिंतन सोहळाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रा मधु जामकर यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री मा. धनंजयजी मुंडे यांनी विशेष शुभेच्छा पत्र पाठवले होते . त्या शुभेच्छा शुभेच्छापत्राचे वाचन मोहन साखरे यांनी केले .याशिवाय शांतीलाल लाहोटी परिवाराच्यावतीने स्व.रंगलालजी लाहोटी व स्व.रुक्मिणीदेवी लाहोटी यांच्या स्मरणार्थ ग्रामीण वाचनालयांस  कृषीविषयक ग्रंथसंपदेचे वितरण  करण्यात आले. यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली .

Click:*'त्या' विवाहितेच्या आत्महत्येला कारणीभूत लोकांविरुद्ध परळीत गुन्हा; आरोपींवर कारवाईची भावाची आर्त मागणी*  



अशा त्रिविध कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मसाप परळी शाखेचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी हे होते.तर व्यासपीठावर आबासाहेब वाघमारे , विकासराव डुबे , अरुणा दिवेगावकर आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत मुंडे यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. डॉ.राजकुमार यल्लावाड यांनी केले. सन्मानपत्राचे वाचन दिवाकर जोशी , प्रा. संजय आघाव यांनी तर आभारप्रकटन प्रा. अरुण पवार यांनी केले.

Click: परळी शिवारात विहिरीत आढळला मृतदेह*

 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी     मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, सचिव प्रा.डॉ. राजकुमार यल्लावाड, कार्याध्यक्ष अनंत मुंडे, उपाध्यक्ष अरुण पवार , कोषाध्यक्ष प्रा.संजय अघाव,  बंडू अघाव यांच्यासह , सहसचिव सुनिता कोमावार  ,  उपाध्यक्ष चेतना गौरशेटे '   प्रसिद्धी प्रमुख बालाजी कांबळे, ,प्रा. अर्चना चव्हाण ,सिध्देश्वर इंगोले , मुक्तविहारी ऊर्फ केशव कुकडे, विजया दहिवाळ, प्रा .सुलभा वाघमारे, प्रा .डॉ .राजाभाऊ धायगुडे , भवानराव देशमुख, महेश होनमाने, दिवाकर जोशी , लक्ष्मण लाड , गणपत गणगोपलवाड , , प्रा.डॉ. रा .ज. चाटे , प्रा.डॉ. बापू घोलप  यांनी विशेष परिश्रम घेतले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!