MB NEWS-आ.मिटकरी यांनी हिंदू समाजाच्या बद्दल अपशब्द वापरून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी* समस्त ब्राह्मण समाज संघटनांची बीड येथे मागणी

 आ.मिटकरी यांनी हिंदू समाजाच्या बद्दल अपशब्द वापरून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी



  समस्त ब्राह्मण समाज संघटनांची  बीड येथे मागणी


बीड (प्रतिनिधी).... राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ.अमोल मिटकरी यांनी हिंदू समाजाच्या बद्दल अपशब्द वापरून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी समस्त ब्राह्मण समाज संघटना यांनी केली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इस्लामपूर येथे झालेल्या जाहीर सभेत आ.अमोल मिटकरी यांनी हिन्दू समाजाच्या चालीरीती, मंत्रोच्चार याबाबत अपशब्द वापरून धार्मिक भावना दुखावल्या बद्दल व सामाजिक द्वेष पसरवल्या बद्दल समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती बीड यांनी केली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. अमोल मिटकरी यांनी इस्लामपूर येथे झालेल्या जाहीर सभेत हिंदू समाजाच्या चालीरीती व परंपरे बाबत अपशब्द वापरून टिंगल-टवाळी केल्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे समाजात सर्वत्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. मिटकरी ही व्यक्ती राज्याचा जबाबदार आमदार असून, त्यांनी हिंदू समाजात पौरोहित्य करणाऱ्यां बाबत व विवाह परंपरे बाबत स्वतःला कुठलेही ज्ञान नसतांना चुकीचे विधान करून समाजाची खिल्ली उडवली असून जातीय तेढ निर्माण केली आहे. अशा प्रकारची कृती बालिश बुद्धीतुन अमानवीय आहे. याचा समस्त हिंदू बांधवांनी निषेध केला आहे. या घटनेबाबत अमोल मिटकरी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी समस्त ब्राह्मण समाज संघटना समिती बीड व समस्त ब्राह्मण समाज, हिंदू बांधव यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे. व तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी प्रमोद पुसरेकर, वैभव वैद्य, गजानन जोशी,एडवोकेट अक्षय कुलकर्णी, भालचंद्र कुलकर्णी,अभिजीत बरिदे, संजय पाठक, चंद्रकांत जोशी,प्रमोद रामदासी, रमाकांत कुलकर्णी,सौरभ जोशी,समीर पाटोदकर,तुकाराम काळे, बाळासाहेब ठिगळे,अनिकेत देशपांडे, विनायक देशमुख आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार