MB NEWS-मातृ-पितृ पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त माजलगावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू भागवतमर्मज्ञ ह.भ.प.बाळु महाराज जोशी उखळीकर यांच्या अमृतमय वाणीतून श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ

मातृ-पितृ पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त माजलगावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू

भागवतमर्मज्ञ  ह.भ.प.बाळु महाराज जोशी उखळीकर यांच्या अमृतमय वाणीतून श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ


माजलगाव  (प्रतिनिधी):- प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त आणि मातृ पितृ पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त शहरातील समता कॉलनीत अखंड हरीनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा दि. ७ एप्रिल २०२२ गुरुवार रोजी प्रारंभ झाला असून भाविक भाविक भक्तांनी कथा श्रावणाचा लाभ घ्यावा असे आवाहन तुकाराम नाना सोळंके यांनी केले आहे.

Click: *Live Ambajogai -भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे भाषण*

       शहरातील समता कॉलनीतील दत्त मंदिरात विठ्ठल रुक्मीणी मुर्ती, ज्ञानेश्वर महाराज व श्री तुकाराम महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन आणि कै. बप्पसाहेब कुबा सोळके,कै. मातोश्री कस्तुरबा बप्पसाहेब सोळंके यांच्या पुण्यस्मरण सोहळ्या सप्ताहात दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन सकाळी ७ ते ११ श्री ज्ञानेश्वरी पारायण दुपारी ११ ते १ श्री तुकाराम महाराज गाथा भजन आणि दुपारी २ ते ६ श्री हभ.प. भागवताचार्य बाळु महाराज जोशी उखळीकर यांच्या अमृत वाणीतून भागवत कथा आणि सांयकाळी ६ ते ७ हरीपाठ असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत. दि.१३ एप्रिल रोजी रात्री ८ते १० भागवतमर्मज्ञ हभप बाळु महाराज उखळीकर यांचे किर्तन होणार आहे. या सप्ताहाची सांगतात दि. १४ एप्रिल २०२२ आहे. त्यानिमित्त सकाळी ११ ते १ ह.भ.प. एकनाथ महाराज माने उमरीकर यांचे काल्याचे किर्तन  होणार आहे. दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी भाविक भक्तांनी कथा, किर्तन, आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक ह.भ.प. तुकाराम नाना सोळके, सुरेश सोळंके, दिलीप सोळंके यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !