MB NEWS-प्रकृती स्थिर-विश्रांतीचा सल्ला : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना ह्रदयविकाराचा त्रास; ब्रिच कॅन्डी रुग्णालयात उपचार

 प्रकृती स्थिर-विश्रांतीचा सल्ला : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना ह्रदयविकाराचा त्रास; ब्रिच कॅन्डी रुग्णालयात उपचार

 


मुंबई :  राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड,परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री  धनंजय मुंडे  यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये  दाखल करण्यात आले आहे.त्यांची प्रकृती स्थिर असुन त्यांना पुढील आठ दिवस सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

        सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंडे यांना छातीत किरकोळ त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर तातडीने त्यांना उपरासाठी दाखल करण्यात आले. ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून सध्या त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.मंगळवारी सकाळपासून धनंजय मुंडे यांना अस्वस्थ वाटत होते. ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये डॉ समदानी यांनी तपासणी केली. त्‍यांच्यावर उपचार सुरु असून आता त्‍यांची प्रकृती स्थिर आहे. आणि डॉक्टरांनी आठ दिवसाचा विश्रांतीचा सल्ला दिला, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !