MB NEWS-कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर घातले ट्रॅक्टर: कर्मचारी जखमी;सहा ट्रॅक्टरवर कारवाई

 कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर घातले ट्रॅक्टर: कर्मचारी जखमी;सहा ट्रॅक्टरवर कारवाई



गेवराई , 

तालुक्यातील खामगाव येथील गोदावरी नदी पात्रात अवैध वाळु उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिस अधीक्षक पथकाला मिळाली होती या पथकाने ( दि ४  रोजी सायंकाळी ५)  च्या सुमारास गोदावरी नदीत कारवाई करत ६ ट्रॅक्टर पकडले असुन या कारवाईत पथकातील पोलिस नाईक गणेश धनवडे यांना ट्रॅक्टरने धडक दिल्याने जखमी झाले, त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय गेवराई येथे दाखल केले व या प्रकरणी उशिरा पर्यंत गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

    तालुक्यातील गोदावरी नदी पात्रात अवैध वाळु उपसा काही केल्याने थांबत नसल्याचे चित्र दिसत असुन तालुक्यातील खामगाव येथील गोदावरी नदी पात्रात अवैध वाळु उपसा होत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक  पथकाला मिळाल्यावरून ( दि ४ सोमवार रोजी सायंकाळी ५ ) च्या सुमारास खामगाव येथील गोदावरी नदी पात्रात कारवाई करत तब्बल ६  ट्रॅक्टर पकडले असुन यावेळी पथकातील पोलीस नाईक गणेश धनवडे हे ट्रॅक्टरला पकडण्यासाठी गेले असता ट्रॅक्टरच्या धका लागला असता ते जखमी झाले त्यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय गेवराई येथे दाखल केले होते. ही  कारवाई पोलिस अधीक्षक  पथकातील पोलिस निरीक्षक गणेश धोक्रट,गणेश धनवडे,गोविंद काळे, गेवराई येथील ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल साबळे, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम बोडके सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार