MB NEWS-सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ११ एप्रील पासून नगर परिषदे समोर उपोषण

 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ११ एप्रील पासून नगर परिषदे समोर उपोषण


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

      नगरपरिषदेतील सेवानिवृत्त कर्मचारी यांची फेब्रुवारी व मार्चची पेन्शन मिळावी म्हणून 11 एप्रिल पासून नगरपरिषदे पुढे उपोषणाला बसणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रा.बी.जी.खाडे यांनी सांगितले आहे.

         फेब्रुवारी, मार्च २०२२ ची पेन्शन १९ एप्रिलपुर्वी देण्यात यावी म्हणून सेवानिवृत्त कर्मचा-यांनी 16 मार्च 2012  रोजी  निवेदन दिले होते. जानेवारी 2022 ची पेन्शन 3 एप्रील रोजी खात्यात जमा झाली आहे. मागील दोन वर्षापासून पेन्शन नियमीत मिळत नाही. अनेक वेळा मुख्याधिकारी यांना  निवेदन देऊनही पेनशन वेळेवर केली जात नाही .

       डिसेबर महीन्याची पेन्शन २४ फेब्रुवारी रोजी तर जानेवारी 2022 पेन्शन 3 एप्रिल रोजी दिली. पेन्शन दोन महिन्याच्या फरकाने दिली जाते. मागील दोन वर्षापासून अनेक सेवानिवृत्त कर्मचारि आजाराने ग्रस्त आहेत. अनेकांचे सेवानिवृत्ती चे उपदान मिळाले नाही तर अनेकांना प्रोव्हिडंटही मिळालेला नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे येणे बाकी मिळावी. सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळावी अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. 28 मार्च 2022 रोजी मुख्याधिकारी यांनी संघटनेला बोलण्यासाठी बोलावले होते परंतु निर्णय झाला नाही. त्यानंतर संघटनेस बोलण्यासाठी निरोप मिळाला नाही. त्यामुळे संघटनेने उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. या उपोषणाला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मोठ्या संखेने उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष प्रा. बी. जी खाडे, सरचिटणीस जगनाथ शहाणे, शिवाजीराव देशमुख, नारायण भोसले, सय्यद ताहेर,रहीमभाई व शिवाजी लाटे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार