MB NEWS- सविस्तर बातमी: बर्दापुरच्यापुढे दुधडेअरी जवळील आपघातात सात जण ठार तर १०जण जखमी ; मावंद्याच्या कार्यक्रमाला जात होते राडीलआ:

 बर्दापुरच्यापुढे दुधडेअरी जवळील आपघातात सात जण ठार तर १०जण जखमी ; मावंद्याच्या कार्यक्रमाला जात होते राडीला





अंबाजोगाई..... 

     अंबा कारखाना ते लातूर रोडवर बर्दापुरच्यापुढे नंदगोपाल डेअरी जवळ आज सकाळी भीषण अपघात घडला आहे.या अपघातात मोठी जिवीत हानी झाली आहे. या आपघातात ७ जण  मयत झाले तर १० जण जखमी झाले आहेत.  क्रुजर गाडी व ट्रकचा हा अपघात झाला असुन हे लोक राडीकडे मावंद्याच्या कार्यक्रमाला जाणार होते. 

        अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे आज मावंद्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी लातूर जिल्ह्यातील साई आणि आर्वी येथून नातेवाईक क्रुझर गाडीतून निघाले होते. ते बर्दापूरच्या पुढे नंदगोपाल डेअरीजवळ आले असता त्यांच्या क्रुझरला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात क्रुझरमधील सात जण ठार झाले तर १० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये निर्मला सोमवंशी (३८), स्वाती बोडके (३५), शकुंतला सोमवंशी (३८), सोजरबाई कदम (३७), चित्रा शिंदे (३५), खंडू रोहिले (३५, चालक) आणि अनोळखी एकाचा समावेश आहे. तर, राजमती सोमवंशी (५०), सोनाली सोमवंशी (२५), रंजना माने (३५), परिमला सोमवंशी (७०), दत्तात्रय पवार (४०), शिवाजी पवार (४५), यश बोडके (९), श्रुतिका पवार (६), गुलाबराव सोमवंशी (५०) आणि कमल जाधव (३०) हे दहा जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतात महिला आणि बालकांचा समावेश आहे.

           अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी मदतीसाठी धाव घेतली.मदतकार्यासाठी व उपचारासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सातत्याने मोबाईलवरून संपर्कात राहून या अपघातग्रस्तांना उपचार व अन्य मदतीसाठी लक्ष दिले.

अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी शरद झाडके, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली.

अरूंद रस्ता बनला मृत्यूचा सापळा

           लातूरहून आलेला चौपदरी महामार्ग बर्दापूरच्या पुढे दुपदरी होऊन अरूंद होतो. त्यामुळे अत्यंत वर्दळीचा असेलल्या बर्दापूर ते अंबासाखर दरम्यान सतत अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहेत. अंबासाखर येथील सभेत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी रस्ता चौपदरीकरणाचे आश्वासन दिले होते. मात्र कालौघात हे आश्वासन हवेत विरले असून निष्पाप नागरिकांचा बळी जाण्याच्या घटना सुरूच आहेत. किमान तातडीने या टप्प्यात गतीरोधक तरी टाकावेत अशी मागणी होत आहे.

Video



हे देखील वाचा/पहा🔸

क्लिक करा: 🏵️ *अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करा मागणी घेऊन आंदोलन: यावेळी परळीत नेमकं घडलं असं की.......*

क्लिक करा: 🌑 *दुर्दैवी: वडिलांना घरातून हाकलून देण्यासाठी मुलाकडूनच शिवीगाळ व मारहाण; परळीतील घटना*

क्लिक करा: ⭕ *विजेच्या प्रश्नावर सिरसाळा येथील विज वितरणच्या अधिकाऱ्यास माकप चा घेराव*

क्लिक करा: *प्रा. तपस्या गणेशलाल परदेशी-गुप्ता यांना नांदेड विद्यापीठाची डॉक्टरेट प्रदान*

जाहीरात/Advertis

--------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.
--------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार