MB NEWS-दुःखद वार्ता: शाम दलाल यांचे निधन

 दुःखद वार्ता: शाम दलाल यांचे  निधन 



परळी (प्रतिनिधी)- स्नेहनगर येथील रहिवाशी असलेले शाम भाऊसाहेब दलाल यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शुक्रवारी दुपारी उपचारा दरम्यान  निधन झाले.मृत्यूसमयी ते 46 वर्षांचे होते.त्यांच्या पार्थिवावर शनिवार दि. 23 रोजी सकाळी 10 वाजता परळी येथील सार्वजनिक स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

           वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना येथील शेतकी विभागात मुख्य क्लर्क म्हणून ते काम पाहात होते. अत्यंत मनमिळाऊ, मित्रत्व जपणारा व्यक्ती म्हणून ते सर्व परिचित होते. शाम दलाल यांना गुरुवारी दुपारी परळी येथील राहत्या घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. परळी येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचार सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना दि. २२ एप्रिल २०२२ शुक्रवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. परळी न.प.चे नगरसेवक दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे ते भाच्चे होते. दलाल कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे. 

उद्या अंत्यसंस्कार ....

शाम दलाल यांच्या पार्थिवावर शनिवार दि. २३ रोजी शहरातील सावर्जनिक स्मशानभूमी येथे   सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्ययात्रा स्नेहनगर येथील राहत्या घरापासून सकाळी १० वाजता निघेल.




हे देखील वाचा/पहा🔸

क्लिक करा: 🏵️ *अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करा मागणी घेऊन आंदोलन: यावेळी परळीत नेमकं घडलं असं की.......*

क्लिक करा: 🌑 *दुर्दैवी: वडिलांना घरातून हाकलून देण्यासाठी मुलाकडूनच शिवीगाळ व मारहाण; परळीतील घटना*

क्लिक करा: ⭕ *विजेच्या प्रश्नावर सिरसाळा येथील विज वितरणच्या अधिकाऱ्यास माकप चा घेराव*

क्लिक करा: *प्रा. तपस्या गणेशलाल परदेशी-गुप्ता यांना नांदेड विद्यापीठाची डॉक्टरेट प्रदान*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार